होता सोन्याचा संसार...,4 वर्षांच्या लेकाच्या डोक्यात कुऱ्हाड घातली, बायकोलाही संपवलं; नवऱ्याच्या कृत्याने बुलडाणा हादरलं
- Published by:Sachin S
Last Updated:
राहुल म्हस्के, त्याची पत्नी रूपाली, मुलगा रियांश, वडील हरी गोविंद म्हस्के, आई ताराबाई हरी म्हस्के आणि आजी असे एकूण सहा जण शिक्षक कॉलनीतील घरात वास्तव्यास होते.
राहुल खंडारे, प्रतिनिधी
बुलढाणा: बुलडाण्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पतीने ४ वर्षांच्या मुलासह पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. पत्नी आणि चार वर्षाच्या मुलाची हत्या या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण मेहकर शहर हादरून गेलं असून परिसरात भीती व हळहळ व्यक्त होत आहे. निर्दयी पतीला अटक करण्यात आली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना मेहकर येथील शिक्षक कॉलनी, प्रभाग क्रमांक १ मध्ये घडली. या घटनेत रूपाली राहुल म्हस्के (वय ३०) आणि तिचा ४ वर्षीय मुलगा रियांश राहुल म्हस्के यांचा मृत्यू झाला आहे. तर आरोपी पतीचे नाव राहुल हरी म्हस्के (वय ३५) असं आहे.
मेहकर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यात रियांश हा मुलगा जागीच मृत्युमुखी पडला, तर गंभीर जखमी झालेल्या रूपाली यांना शेजाऱ्यांनी तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. पण खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर रुपाली यांना छत्रपती संभाजीनगर इथं हलवण्यात आलं होतं. पण वाटेत जालन्याजवळ पोहोचले असता त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
advertisement
कुऱ्हाडीने लेकाचं डोकं फोडलं
राहुल म्हस्के, त्याची पत्नी रूपाली, मुलगा रियांश, वडील हरी गोविंद म्हस्के, आई ताराबाई हरी म्हस्के आणि आजी असे एकूण सहा जण शिक्षक कॉलनीतील घरात वास्तव्यास होते. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या राहुल म्हस्केने अचानक घरात ठेवलेली कुऱ्हाड उचलली आणि पत्नी रूपाली आणि मुलगा रियांश यांच्या डोक्यावर वार केले. सपासप वार केल्यामुळे ४ वर्षांचा रियांश हा जागेवरच कोसळला. तर बायको रुपाली ही गंभीर जखमी झाली. घरात किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजारी धावून आले. समोरील दृश्य पाहून सगळेच हादरले. शेजाऱ्यांनी तातडीने रुपालीला नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं.
advertisement
मारेकरी नवऱ्याला अटक
view commentsया घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी राहुल मस्के याला ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांच्याकडून प्राप्त झाली. घटनेमागील नेमकं कारण, संशयाची पार्श्वभूमी आणि आरोपीच्या मानसिक स्थितीबाबत चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 8:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
होता सोन्याचा संसार...,4 वर्षांच्या लेकाच्या डोक्यात कुऱ्हाड घातली, बायकोलाही संपवलं; नवऱ्याच्या कृत्याने बुलडाणा हादरलं











