advertisement

Success Story : शेतकऱ्याचा प्रयोग भारीच, 10 गुंठ्यात केली लसणाची लागवड, दीड लाखांचा मिळाला नफा

Last Updated:

शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी केवळ 10 गुंठे शेतात लसणाची लागवड करून खर्च वजा करून 1 ते 1.50 लाख रुपयांचा नफा कमावला आहे.

+
News18

News18

सोलापूर : पारंपारिक पिकांऐवजी नवीन प्रयोग करून शेतकरी आता भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. मोहोळ तालुक्यातील कोरवली गावातील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी केवळ 10 गुंठे शेतात लसणाची लागवड करून खर्च वजा करून 1 ते 1.50 लाख रुपयांचा नफा कमावला आहे. हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
नोव्हेंबर महिन्यात ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी शेताची मशागत करून कोळशाची राख टाकली आणि लसणाची लागवड केली. लसणावर करपा आणि भुरी रोग होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी दोन-तीन वेळा फवारणी केली. केवळ चार महिन्यांत लसूण तयार झाले. लागवडीसाठी 20 ते 25 हजार रुपयांचा खर्च आला असून, विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाने नफा उभा राहिला.
advertisement
हिप्परकर हे व्यापाऱ्यांकडे विक्रीऐवजी स्वतः आठवडी बाजारात लसूण घेऊन जाऊन विकतात. यामुळे अधिक भाव मिळतो आणि नफा वाढतो. शेती परवडत नाही, असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांनी पिकाचे योग्य नियोजन करावे आणि बाजारात स्वतः विक्री करावी. असा प्रयोग केल्यास भरपूर उत्पन्न मिळेल, असा सल्ला त्यांनी दिला. हिप्परकर यांचा हा यशस्वी प्रयोग सध्या जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, कमी जमिनीतही योग्य नियोजनाद्वारे लाखो रुपये कमवता येतात, हे यातून स्पष्ट झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : शेतकऱ्याचा प्रयोग भारीच, 10 गुंठ्यात केली लसणाची लागवड, दीड लाखांचा मिळाला नफा
Next Article
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement