Rajpal Yadav Case: '...तरच सुटका होईल', राजपाल यादव यांना हायकोर्टाचा अल्टीमेटम, आजच्या सुनावणीत काय ठरलं?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rajpal Yadav case: दिल्ली उच्च न्यायालयात राजपाल यांच्या जामिनासाठी मोठी खलबतं सुरू आहेत. राजपाल यांच्या वकिलांनी १.५ कोटी रुपये भरण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, राजपाल यादव यांना हायकोर्टाने अल्टिमेटम दिला आहे.
advertisement
advertisement
राजपाल यादव यांचा दिग्दर्शकीय चित्रपट 'अता पता लापता'मध्ये काम केलेले अभिनेते पदम सिंह यांनी राजपाल यांच्या स्वभावाबद्दल मोठा खुलासा केला आहे. पदम सिंह म्हणतात, "मी राजपालला १९९७ पासून ओळखतो. तो केवळ माझा सहकलाकार नाही, तर कुटुंबासारखा आहे. त्याने 'अता पता लापता' हा प्रामाणिक हेतूने बनवला होता, पण दुर्दैवाने तो चालला नाही. पण म्हणून राजपालची नियत बदललेली नाही. तो अत्यंत प्रामाणिक माणूस आहे. जर त्याला थोडा वेळ मिळाला, तर तो सर्वांचा एक-एक रुपया व्याजासह परत करेल, याची मला खात्री आहे."
advertisement
advertisement
advertisement
आज दुपारी ३ वाजेपर्यंत दीड कोटींचा डीडी जमा केला, तरच राजपाल यांची सुटका होईल, असं कोर्टाने बजावलं आहे. याआधी त्यांनी ७५ लाख आणि २५ लाखांचे डीडी जमा केले आहेत. कोर्टाने राजपाल यांच्यावर ताशेरे ओढताना म्हटलं की, "तुम्ही दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही, म्हणूनच तुम्हाला जेलची पायरी चढावी लागली आहे."
advertisement
१२ फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने राजपाल यांना चांगलंच सुनावलं होतं. राजपाल यांनी कोर्टात वारंवार पैसे भरण्याची आश्वासनं दिली होती, पण ती पाळली नाहीत. त्यामुळे कोर्टाने नाराजी व्यक्त करत त्यांची जामीन अर्जाची सुनावणी आज १६ फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर टाकली होती. कोर्टाने स्पष्ट केलं होतं की, आधी कायद्यानुसार शिक्षा भोगण्याची आणि शरणागतीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.








