advertisement

Mumbai : प्रवासादरम्यान तब्येत बिघडली तरी काळजी नको, या स्थानकावर मिळणार मदत; रेल्वेचा प्लॅन काय?

Last Updated:

Mumbai Central Railway : लोकल ट्रेनचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी किंवा एक्सप्रेसमधील प्रवाशांसाठी आता रेल्वेने एक मेगा प्लॅन तयार केला आहे. जिथे प्रवाशांची होणारी धावपळ आता थांबणार आहे.

Emergency medical rooms at Mumbai suburban railway stations
Emergency medical rooms at Mumbai suburban railway stations
मुंबई : मुंबईच्या उपनगरी रेल्वे मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रचंड गर्दी आणि धावपळीमुळे काही वेळा प्रवाशांना अचानक तब्येत बिघडणे, अपघात होणे किंवा हृदयविकाराचा झटका येणे अशा गंभीर घटना घडतात. अशा वेळी तात्काळ वैद्यकीय मदत मिळणे खूप गरजेचे असते.
प्रवासात अचानक आजारी पडलात? आता टेन्शन सोडा
ही गरज लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई विभागातील अनेक उपनगरी स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या वैद्यकीत रुममध्ये प्राथमिक उपचार, ऑक्सिजन सुविधा, स्ट्रेचर, लाइफ सपोर्ट उपकरणे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध असतील. त्यामुळे रुग्णवाहिका येण्यापूर्वीच रुग्णाला आवश्यक उपचार देता येतील.
advertisement
कोणत्या स्थानकांवर मिळणार सुविधा?
पहिल्या टप्प्यात कळवा, टिटवाळा, कर्जत, कुर्ला, ठाणे, मुंब्रा, घाटकोपर, चेंबूर, मानखुर्द आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या 10 स्थानकांवर वैद्यकीय कक्ष उभारले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात कसारा, दादर, डोंबिवली, सायन, विक्रोळी, भांडुप, दिवा आणि इगतपुरी या 8 स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध होईल.
दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर उपनगरी रेल्वे मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर तातडीची वैद्यकीय मदत मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेत मोठी वाढ होणार असून गंभीर परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : प्रवासादरम्यान तब्येत बिघडली तरी काळजी नको, या स्थानकावर मिळणार मदत; रेल्वेचा प्लॅन काय?
Next Article
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement