Success Story: कॉर्पोरेट नोकरी सोडली अन् सुरू केला बिझनेस, आता महिन्याला लाखोंची उलाढाल
- Reported by:Pooja Satyavan Patil
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
पुण्यातील रोशन साठे यांनी मॅनेजर पदाचा राजीनामा देऊन घरपोच कार आणि टू व्हीलर सर्विसिंगचा व्यवसाय सुरू केला आहे.या व्यवसायातून त्यांना महिन्याला दीड लाखांची कमाई होत आहे.
प्रतिनिधी- पूजा सत्यवान पाटील, पुणे
पुणे: पुण्यातील उरुळी कांचन परिसरात राहणारे रोशन साठे यांनी मॅनेजर पदाचा राजीनामा देऊन घरपोच कार आणि टू व्हीलर सर्व्हिसिंगचा व्यवसाय सुरू केला. "एक कॉल करा, मेकॅनिक तुमच्या दारात येईल आणि तुमची कार तुमच्या डोळ्यासमोर दुरुस्त करून देईल" या संकल्पनेतून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. फार कमी दिवसांतच हा व्यवसाय नागरिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला.
advertisement
Hii mechanic या सेवेअंतर्गत एक फोन केल्यावर संबंधित ठिकाणी मेकॅनिक पाठवला जातो. कार रस्त्यात बंद पडली असो किंवा घरीच दुरुस्तीची गरज असो, ग्राहक जिथे असेल तिथे जाऊन कारची दुरुस्ती केली जाते. सध्या या बिझनेसच्या माध्यमातून रोशन यांची महिन्याकाठी दीड लाखांची उलाढाल करत आहेत. याविषयी अधिक माहिती रोशन साठे यांनी 'लोकल 18' ला दिली आहे.
advertisement
रोशन साठे यांनी 'लोकल 18' सोबत बोलताना सांगितले की, स्टार्टअप्स सुरू करण्यापूर्णी त्यांनी मारुती सुझुकी, ह्युंडाई कंपनीत काम केलं आहे. त्याठिकाणी त्यांनी customer care manager म्हणून काम पाहिले आहे. तिथे त्यांना पगार सुद्धा चांगला होता, मात्र स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा त्यांच्या मनात होती. नोकरी करत असतानाच ग्राहकांना येणाऱ्या अडचणींचा त्यांना चांगला अनुभव आला. त्यातूनच ही कल्पना सुचली आणि त्यांनी Hii mechanic या नावाने 4 वर्षापूर्वी व्यवसाय सुरू केला.
advertisement
कस्टमरने कॉल केला की ग्राहक ज्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणी जाऊन कारची दुरुस्ती केली जाते. विशेष म्हणजे घरी किंवा रस्त्यावर येऊन कारची सर्व्हिस दिली तरी यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. Hii mechanic माध्यमातून कार तसेच टू-व्हीलर सर्व्हिसिंगची सुविधा ग्राहकांच्या दारात दिली जाते. यामध्ये कार सर्व्हिस, कार वॉशिंग, टू-व्हीलर सर्व्हिस, इन्शुरन्स तसेच अंडरबॉडी कोटिंग अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. या सेवांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 1,500 ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात त्यांना यश आले आहे. सध्या या व्यवसायाची महिन्याची उलाढाल सुमारे दीड लाखापर्यंत पोहोचली आहे.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 8:18 PM IST
मराठी बातम्या/Success Story/
Success Story: कॉर्पोरेट नोकरी सोडली अन् सुरू केला बिझनेस, आता महिन्याला लाखोंची उलाढाल








