Winter Care : हिवाळ्यात जवळ ठेवा हे त्रिकूट, प्रतिकारशक्ती वाढेल, तब्येत राहिल चांगली

Last Updated:

हिवाळ्यात रोजच्या आहाराव्यतिरिक्त शरीराची प्रतिकारशक्ती चांगली राखण्यासाठी आणखी पोषक घटकांची आवश्यकता भासते. शरीर उबदार ठेवणं, शरीराला पुरेशी ऊर्जा देण्यासाठी एक त्रिकूट उपयुक्त ठरेल. या ऋतूत हळद, गूळ आणि काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

News18
News18
मुंबई : हिवाळ्यात सर्दी, खोकला होण्याच्या तक्रारी जास्त जाणवतात. खाण्यापिण्याच्या सवयींमधे थोडे बदल होतात. काहीसं जड अन्न खाल्लं जातं. घसा व्यवस्थित राहावा म्हणून गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
हिवाळ्यात रोजच्या आहाराव्यतिरिक्त शरीराची प्रतिकारशक्ती चांगली राखण्यासाठी आणखी पोषक घटकांची आवश्यकता भासते. शरीर उबदार ठेवणं, शरीराला पुरेशी ऊर्जा देण्यासाठी एक त्रिकूट उपयुक्त ठरेल. या ऋतूत हळद, गूळ आणि काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
शास्त्रज्ञांनी या त्रिकुटाचा अभ्यास केला त्यातले निष्कर्ष खूप महत्त्वाचे आहेत. हळदीमधे अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, यामुळे शरीराला उबदारपणा आणि ऊर्जा मिळते.
advertisement
काळ्या मिरीमधे पाइपरिन नावाचा घटक असतो. यामुळे पचनसंस्थेला बळकटी मिळते आणि आपल्या शरीराला उबदारपणा मिळतो. गुळामधे लोह आणि इतर खनिजंही असतात.
त्यामुळे, हिवाळ्यात पचनसंस्था, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे त्रिकूट महत्त्वाचं आहे.
दैनंदिन आहारात या तिन्ही गोष्टींचा समावेश करू शकता. चहा किंवा दुधात हळद आणि काळी मिरी घालू शकता. जेवणात गूळ देखील वापरू शकता.
advertisement
हळद, गूळ आणि काळी मिरी वापरुन तयार केलेलं गरम पाणी हिवाळ्यात खूपच फायदेशीर आहे. यासाठी,एक कप दूध किंवा पाणी गरम करा. अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी घाला. त्यात गूळ मिसळा आणि गरम गरम प्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Care : हिवाळ्यात जवळ ठेवा हे त्रिकूट, प्रतिकारशक्ती वाढेल, तब्येत राहिल चांगली
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement