Daily Horoscope: पुत्रदा एकादशीचा दिवस कोणासाठी लकी? मेष ते मीन 12 राशींचे दैनिक राशीफळ
- Written by:Chirag Daruwalla
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, December 30, 2025 By Chirag Daruwalla: मंगळवारी पुत्रदा एकादशी आहे, ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशीभविष्य सांगितलं जातं. ग्रहस्थितीनुसार राशींवर कसा परिणाम असेल, ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या.
आजचा दिवस मेष राशीसाठी थोडासा कठीण जाऊ शकतो. अंगात फारशी ऊर्जा किंवा उत्साह जाणवणार नाही, त्यामुळे आजूबाजूचं वातावरणही जड वाटू शकतं. काही अडचणी समोर येऊ शकतात ज्यामुळे मनात चिंता निर्माण होईल. आत्मविश्वास थोडा डळमळीत होऊ शकतो, पण शक्य तितका सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. नात्यांमध्येही थोडा तणाव जाणवू शकतो. आज लोकांशी बोलताना मृदू आणि संयमाने वागणं गरजेचं आहे. लहानसहान गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शब्द जपून वापरा. वाद टाळणंच आज जास्त योग्य ठरेल. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, शांत बसणं किंवा स्वतःशी थोडा वेळ घालवणं उपयोगी ठरेल. आतल्या आवाजाकडे लक्ष दिलंत तर मन हलकं होईल. आजचा दिवस स्वतःकडे पाहण्याचा आणि भावना समजून घेण्याचा आहे.लकी अंक: 2लकी रंग: गुलाबी
advertisement
आजचा दिवस वृषभ राशीसाठी आव्हानात्मक ठरू शकतो. नात्यांमध्ये थोडा दुरावा जाणवू शकतो आणि जवळच्या लोकांपासून अंतर असल्यासारखं वाटू शकतं. त्यामुळे मनात चिंता येणं साहजिक आहे. ही वेळ स्वतःच्या भावनांकडे पाहण्याची आहे. नेमकं काय वाटतंय आणि का वाटतंय, याचा विचार करा. परिस्थिती थोडी अस्थिर वाटली तरी घाबरू नका. नात्यांमध्ये संवाद ठेवणं आज खूप महत्त्वाचं आहे. मनातलं स्पष्टपणे बोललंत तर बऱ्याच गोष्टी सुटू शकतात. स्वतःचा मूड हलका ठेवण्यासाठी आवडती कामं करा. आज विचार थोडे नकारात्मक होऊ शकतात, पण त्याकडे जास्त लक्ष देऊ नका. थोडी सकारात्मक दृष्टी ठेवल्यास परिस्थिती नक्की सुधारेल. एकत्र वेळ घालवताना एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस भावना ओळखायला आणि त्यात समतोल साधायला मदत करेल.लकी अंक: 5लकी रंग: नारंगी
advertisement
आजचा दिवस मिथुन राशीसाठी खूपच छान आहे. आज तुम्ही लोकांशी प्रेमाने आणि समजूतदारपणे वागाल. बोलणं खूप प्रभावी राहील, त्यामुळे मनातले विचार आणि भावना नीट मांडता येतील. आज सर्जनशीलता वेगळ्याच पातळीवर दिसून येईल. एखादा नवीन छंद किंवा काम सुरू करण्याची इच्छा होऊ शकते. प्रियजनांसोबत वेळ घालवताना मनापासून आनंद मिळेल आणि नाती अजून घट्ट होतील. आजचा दिवस तुम्हाला नात्यांकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकवेल. तुमचा मोकळा आणि मिळून मिसळून राहणारा स्वभाव नवीन ओळखी घडवून आणू शकतो. लक्षात ठेवा, मोकळेपणा आणि संवादामुळेच नाती टिकतात. आत्मविश्वासाने पुढे चला, आजचा दिवस प्रेम आणि मैत्रीसाठी खूप चांगला आहे.लकी अंक: 10लकी रंग: निळा
advertisement
आजचा दिवस कर्क राशीसाठी एकूणच खूप चांगला असेल. आजूबाजूच्या लोकांकडून सकारात्मकता आणि साथ मिळेल. तुमचा हळवा आणि समजूतदार स्वभाव आज उपयोगी पडेल. नात्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी जाणवेल. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवला तर मन भरून येईल. संवाद साधण्यासाठी आजची वेळ खूप योग्य आहे. तुमची सहानुभूती तुम्हाला नवीन नात्यांकडे घेऊन जाऊ शकते. भावना व्यक्त करणं आज सोपं जाईल आणि त्यामुळे नाती अधिक मजबूत होतील. आज समाधान आणि आनंद देणारा दिवस आहे. इतरांना मदत करण्याची संधीही मिळू शकते. तुमची करुणा लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण करेल.लकी अंक: 11लकी रंग: नेव्ही ब्लू
advertisement
आजचा दिवस सिंह राशीसाठी थोडासा कठीण जाऊ शकतो. भावना आणि वैयक्तिक आयुष्यात तणाव जाणवू शकतो. आजूबाजूची परिस्थिती अस्थिर वाटल्यामुळे अस्वस्थता येऊ शकते. नात्यांमध्ये चिंता आणि संकोच जाणवू शकतो. जवळच्या व्यक्तींशी थोडा दुरावा जाणवण्याची शक्यता आहे. अशावेळी स्वतःला सावरून घेणं गरजेचं आहे. बोलताना जपून बोला, कारण आज जास्त संयमाची गरज आहे. प्रियजनांशी मन मोकळं केल्यास ताण हलका होईल. लक्षात ठेवा, कठीण काळातच नाती खरी असतात. आज मोठे बदल न करता छोट्या सुधारणा करण्यावर लक्ष द्या. मानसिक आरोग्य जपा आणि आवडत्या गोष्टींमधून स्वतःला सावरायचा प्रयत्न करा.लकी अंक: 1लकी रंग: हिरवा
advertisement
आजचा दिवस कन्या राशीसाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. मनात असमाधान आणि चिडचिड जाणवू शकते. विचारांमध्ये नकारात्मकता वाढू शकते, ज्याचा परिणाम नात्यांवर होऊ शकतो. जोडीदारासोबत किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम ठेवा. संवाद कमी झाल्यास गैरसमज वाढू शकतात. लहान गोष्टींवर अडकू नका. एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. राग आणि चिडचिड नात्यावर हावी होऊ देऊ नका. आज सकारात्मक विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. थोडा संयम आणि समजूतदारपणा ठेवलात तर हा दिवस नातं मजबूत करण्याची संधी ठरू शकतो.लकी अंक: 3लकी रंग: गडद हिरवा
advertisement
आजचा दिवस तूळ राशीसाठी खूप शुभ आहे. आतून सकारात्मक ऊर्जा जाणवेल. नात्यांमध्ये नवाच उत्साह येईल आणि प्रियजनांशी जवळीक वाढेल. तुम्ही आज खूप बोलके आणि प्रेमळ असाल. छोट्या गोष्टींतही आनंद मिळेल. नात्यांबाबत संवेदनशीलता वाढेल आणि नवीन ओळखीही होऊ शकतात. आज एकमेकांना समजून घेण्याची वेळ आहे. विचार स्पष्ट असल्यामुळे संवाद सोपा जाईल. एकत्र काहीतरी करण्याचा आनंद घ्या, मग ती छोटी सहल असो किंवा शांत वेळ. संयम आणि समजूतदारपणाने तुम्ही प्रत्येक गोष्ट हाताळाल. आजचा दिवस नात्यांमध्ये सर्जनशीलता आणणारा आहे. या क्षणांचा मनापासून आनंद घ्या.लकी अंक: 9लकी रंग: काळा
advertisement
आजचा दिवस वृश्चिक राशीसाठी खूपच छान आहे. आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा जाणवेल. तुमची संवेदनशीलता तुम्हाला लोकांशी खोल नातं जोडायला मदत करेल. नात्यांमध्ये समज आणि सहकार्य वाढेल. आज तुमच्यात एक वेगळंच आकर्षण असेल, त्यामुळे लोक तुमच्याकडे ओढले जातील. मनाचं ऐकण्याची आणि नातं मजबूत करण्याची ही उत्तम वेळ आहे. एखादा गोड क्षण किंवा नवीन ओळख आयुष्यात येऊ शकते. भावना मोकळेपणाने व्यक्त केल्यामुळे नात्यांमध्ये ताजेपणा येईल. प्रियजनांसोबत वेळ घालवा आणि या सकारात्मक काळाचा आनंद घ्या.लकी अंक: 8लकी रंग: लाल
advertisement
धनु - आजचा दिवस थोडासा कठीण जाऊ शकतो. काही अडचणी आणि चिंता मनावर येऊ शकतात. भावना व्यक्त करताना संकोच वाटू शकतो, ज्यामुळे नात्यांमध्ये अडथळे येऊ शकतात. अपेक्षा पूर्ण न झाल्याने नाराजी जाणवू शकते. त्यामुळे स्वतःला लोकांपासून दूर ठेवण्याची भावना येऊ शकते. पण नात्यांमध्ये मोकळेपणा आणि प्रामाणिकपणा खूप गरजेचा आहे. संवाद कमी झाला तर गैरसमज वाढू शकतात. या अडचणी असूनही, हा काळ नात्यांचा विचार करण्याची आणि त्यांना सुधारण्याची संधी देतो. योग्य दृष्टीकोन ठेवला तर या अनुभवातून चांगला बदल घडू शकतो.लकी अंक: 5लकी रंग: पांढरा
advertisement
आजचा दिवस मकर राशीसाठी खूप सकारात्मक आहे. आयुष्यात समतोल आणि शांतता जाणवेल. नात्यांमध्ये जवळीक वाढेल आणि प्रियजनांसोबत वेळ खास वाटेल. भावना व्यक्त करण्यासाठी आज योग्य वेळ आहे. संभाषण मोकळं आणि अर्थपूर्ण राहील. आज तुम्ही लोकांशी नाती अधिक मजबूत करू शकाल. मैत्री आणि समजूतदारपणा वाढेल. विचार स्पष्ट असल्यामुळे नात्यांमध्ये गोडवा येईल. आजचा दिवस समाधान आणि प्रेम देणारा आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घ्या.लकी अंक: 2लकी रंग: गुलाबी
advertisement
आजचा दिवस कुंभ राशीसाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. भावना अस्थिर राहू शकतात आणि नात्यांमध्ये तणाव जाणवू शकतो. जवळच्या लोकांशी बोलताना जपून बोला. नकारात्मक विचारांचा संवादावर परिणाम होऊ देऊ नका. नात्यांमध्ये चढ-उतार संभवतात. काहीतरी त्रास देत असेल तर ते मनात न ठेवता मोकळेपणाने बोला. त्यामुळे मन हलकं होईल आणि नातंही सुधारेल. स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. ध्यान किंवा योग उपयोगी ठरू शकतो. कठीण काळ कायमचा नसतो, हे लक्षात ठेवा. संयम आणि समजूतदारपणा ठेवलात तर सगळं सुरळीत होईल.लकी अंक: 7लकी रंग: जांभळा
advertisement
आजचा दिवस मीन राशीसाठी खूपच छान आहे. तुमची संवेदनशीलता आणि अंतर्ज्ञान आज विशेष ताकद ठरेल. लोकांशी खोल आणि अर्थपूर्ण नाती जोडली जातील. योग्य निर्णय घेण्यास अंतर्ज्ञान मदत करेल. प्रियजनांसोबत वेळ घालवताना मन आनंदी राहील. संवाद मोकळा आणि प्रामाणिक राहील, त्यामुळे नाती अधिक घट्ट होतील. सर्जनशील कामातून समाधान मिळेल. आज स्वतःला व्यक्त करण्यासाठी उत्तम वेळ आहे. मनातलं न लपवता बोला. एकूणच आजचा दिवस आनंद, समाधान आणि सकारात्मकतेने भरलेला आहे. नात्यांची काळजी घ्या आणि स्वतःच्या सर्जनशीलतेला मान द्या.लकी अंक: 6लकी रंग: पिवळा









