Science : मोठमोठ्या फॅक्ट्रींच्या उंच टोकावर 24 तास आग का जळत असते? काय आहे Flare Stack चा फायदा?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ही आग लांबून पाहाताना अनेकांना वाटतं की कुठेतरी आग लागली आहे, पण ही आग कोणताही अपघात नसते तर ती एक अत्यंत महत्त्वाची 'सुरक्षा यंत्रणा' आहे. ही आग का लावली जाते, हे सोप्या भाषेत समजून घेऊया.
रस्त्यावरून जाताना एखाद्या मोठ्या फॅक्टरीच्या किंवा रिफायनरीच्या चिमणीवर सतत आग जळताना आपण अनेकदा पाहतो. ही दृश्ये पाहून मनात प्रश्न येतो की, तिथे आग का लागली असेल? किंवा कोणीतरी मुद्दाम ती लावली आहे का? ही आग विझवली का जात नाही? ही आग लांबून पाहाताना अनेकांना वाटतं की कुठेतरी आग लागली आहे, पण ही आग कोणताही अपघात नसते तर ती एक अत्यंत महत्त्वाची 'सुरक्षा यंत्रणा' आहे. ही आग का लावली जाते, हे सोप्या भाषेत समजून घेऊया.
advertisement
advertisement
1. प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखं कामजसं आपल्या घरात प्रेशर कुकरमध्ये जास्त वाफ झाली की शिट्टी वाजून ती बाहेर पडते, तसंच मोठ्या फॅक्टरीमध्ये किंवा रिफायनरीमध्ये यंत्रांवरचा ताण कमी करण्यासाठी ही यंत्रणा असते. जर प्लांटमध्ये वायूचा दाब मर्यादेपेक्षा जास्त वाढला, तर मोठी दुर्घटना किंवा स्फोट होऊ शकतो. अशा वेळी हा जास्तीचा गॅस फ्लेअर स्टॅकद्वारे बाहेर काढून जाळला जातो.
advertisement
2. विषारी वायूंचा धोका टाळण्यासाठीअनेक केमिकल फॅक्टरीज किंवा ऑईल रिफायनरीमधून काही विषारी वायू (Toxic Gases) बाहेर पडत असतात. जर हे गॅस तसेच हवेत सोडले, तर लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. पण जेव्हा हे वायू 'फ्लेअर' (जाळले) केले जातात, तेव्हा त्यातील घातक घटकांचे रूपांतर कमी घातक अशा कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याच्या वाफेत होते.
advertisement
3. पर्यावरणाचे रक्षणरिफायनरीमध्ये मिथेनसारखे वायू तयार होतात. मिथेन हा वायू पर्यावरणासाठी कार्बन डायऑक्साइडपेक्षा 25 पटीने जास्त घातक आहे. जर हा गॅस थेट हवेत सोडला तर ग्लोबल वॉर्मिंग वाढेल. त्यामुळे हा गॅस जाळून त्याचे रूपांतर कार्बन डायऑक्साइडमध्ये करणे पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक सुरक्षित मानले जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
थोडक्यात सांगायचे तर, फ्लेअर स्टॅकमधून निघणारी ती आग म्हणजे फॅक्टरीचे 'सेफ्टी व्हॉल्व्ह' आहे. ती आग जितकी मोठी, तितका प्लांटमधील वाढलेला दाब बाहेर काढला जातोय असं समजावं. त्यामुळे पुढच्या वेळी ही आग पाहिल्यावर घाबरू नका, कारण ती आग फॅक्टरीला आणि आजूबाजूच्या परिसराला सुरक्षित ठेवण्यासाठीच लावलेली असते.










