'30 मिनिटात पैसे भरा नाहीतर...' ऑनलाईन फ्रॉडमधून थोडक्यात वाचला चिन्मय मांडलेकर, सांगितला धक्कादायक अनुभव
- Published by:Minal Gurav
Last Updated:
चिन्मय मांडलेकर आणि पत्नीबरोबर एक धक्कादायक प्रकार घडला. त्याचं आर्थिक नुकसान होता होता राहिला. नेमकं काय घडलं हे त्याने व्हिडीओ शेअर करत सविस्तर सांगितलं.
ऑनलाईन फसवणूकीचे अनेक दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. सर्वसामान्य लोकंच नाही तर कलाकारांना सुद्धा ऑनलाइन फसवणूकीला सामोरं जावं लागत आहे. प्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकरच्या बाबतीतही असाच प्रकार घडला पण वेळीच सर्तक झाल्यानं तो आणि त्याची पत्नी थोडक्यात बचावले. नेमकं काय झालं हे चिन्मयने व्हिडीओ शेअर करत सांगितलं. त्याने व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
चिन्मयच्या पत्नी नेहा मांडलेकर हिला गॅस बिल भरण्याच्या बहाण्याने खोटा फोन आला होता. पण वेळीच सतर्क राहिल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले नाही. चिन्मयच्या पत्नीला गॅस कनेक्शनचं बिल भरलं नसल्याचा फोन आला. 'जानेवारी महिन्याचं 1068 रुपये बिल भरले नाहीत, बिल अपडेट दिसत नाही, व्हाट्स अपला पाठवलेली apk फाईल डाउनलोड करा' असं फोनवर सांगण्यात आलं. जर 30 मिनिटात बिल भरलं नाही तर आमचे लोक येऊन कनेक्शन कट करतील असं त्यांनी सांगितलं.
advertisement
पण हा फोन फसवणूकीचा असल्याचा प्रकार नेहा यांच्या वेळीच लक्षात आला आणि त्यांनी समोरच्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. मला कुठलाही मेसेज आला नाही असं सांगितलं तिनं सांगितलं. जे कनेक्शन कट करायला लोकं येणार आहेत त्यांना अगोदर मला भेटायला सांगा असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या या बोलवण्यावरून समोरचा व्यक्ती चाचपडला आणि त्याने फोन कट केला.
advertisement
advertisement
असा धक्कादायक प्रकार इतरांसोबत घडू नयेत म्हणून चिन्मयने या फ्रॉडचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलंय, "माझ्या पत्नीला MGL चा प्रतिनिधी असल्याचे भासवून एका फसवणूक करणाऱ्याने फोन केला. मित्रांनो, चोर लुटायला बसले आहेत… सतर्क राहा. सुरक्षित राहा. फसवणूक करणारे अनेकदा विश्वासार्ह सेवा पुरवठादार असल्याचे भासवतात. बनावट लिंक, APK डाउनलोड, तसेच व्हॉट्सअॅप किंवा एसएमएसद्वारे ते लोकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. कोणतीही कृती करण्यापूर्वी माहितीची खातरजमा करा आणि सजग राहा. MGL कधीही संदेश किंवा फोनद्वारे तुमचे OTP, बँक तपशील किंवा पासवर्ड विचारत नाही."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 1:19 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'30 मिनिटात पैसे भरा नाहीतर...' ऑनलाईन फ्रॉडमधून थोडक्यात वाचला चिन्मय मांडलेकर, सांगितला धक्कादायक अनुभव









