advertisement

उन्हाळ्यात वसई-विरारकरांचा प्रवास होणार गारेगार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

Last Updated:

E-Bus Update : वसई-विरार शहरातील बसस्थानकावर सकाळच्या गर्दीचे चित्र. वाढत्या लोकसंख्येमुळे बसमध्ये प्रचंड गर्दी होत असून प्रवासी अतिरिक्त बसफेऱ्यांची मागणी करत आहेत.

News18
News18
वसई : वसई आणि विरार शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. उकडत्या गर्मीत नागरिकांना गारेगार प्रवास करता येण्याची शक्यता आहे.
बसेस वाढणार का?
वसई–विरार शहरात बसफेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र सध्य स्थितीला बसांची संख्या अपुरी असल्याने तात्काळ वाढ करणे शक्य होत नाही. सध्या महापालिकेच्या परिवहन विभागाकडे एकूण 114 बसेस आहेत ज्या त्या मार्गांवर धावत आहेत. दररोज सुमारे 2,200 फेऱ्या होत असून हजारो प्रवासी या सेवेचा लाभ घेतात.
advertisement
शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने बसमधील गर्दीही वाढली आहे. विशेषतहा सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत नोकरदारांची मोठी गर्दी होते. अनेकदा बस क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करताना दिसतात. काही भागात रिक्षा वेळेवर मिळत नसल्याने प्रवाशांना अधिक त्रास सहन करावा लागतो.
एप्रिलअखेर 100 नव्या ई-बस
महापालिकेने मागील दोन वर्षांत ई-बस सेवेला प्राधान्य दिले आहे. सध्या 40 ई-बस सेवेत आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान अनुदान योजनेतून आणखी 100 ई-बस मिळणार आहेत. त्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र या बस एप्रिलअखेरपर्यंत उपलब्ध होणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
advertisement
स्मार्ट कार्ड सेवा लवकरच सुरू
बसांची संख्या वाढल्यानंतर ज्या भागात फेऱ्या कमी आहेत, तेथे प्राधान्याने सेवा वाढवली जाईल असे परिवहन व्यवस्थापक धैर्यशील जाधव यांनी सांगितले. तसेच सवलत योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी स्मार्ट कार्ड सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
उन्हाळ्यात वसई-विरारकरांचा प्रवास होणार गारेगार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement