advertisement

लेकीला पायलट व्हायचं होतं; वडिलांनीही दिली साथ, पण पुण्यातील 'त्या' कुटुंबासोबत 2 वर्षात भयंकर घडलं

Last Updated:

मुलीनं आकाशाला गवसणी घालावी, वैमानिक (पायलट) होऊन नाव कमवावं, असं पुण्याच्या चहोली परिसरातील बिरनारायण सिंग यांनाही वाटत होतं.

वैमानिक व्हायचं स्वप्न अधुरंच (प्रतिकात्मक फोटो)
वैमानिक व्हायचं स्वप्न अधुरंच (प्रतिकात्मक फोटो)
पिंपरी-चिंचवड : आपल्या पाल्यानं आयुष्यात खूप मोठं बनावं, नाव कमवावं, असं प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. अशीच अपेक्षा होती, पुण्यातील एका वडिलांची. आपल्या मुलीनं आकाशाला गवसणी घालावी, वैमानिक (पायलट) होऊन नाव कमवावं, असं पुण्याच्या चहोली परिसरातील बिरनारायण सिंग यांनाही वाटत होतं. आपल्या मुलीचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी जिवाचं रान केलं. मात्र, याच स्वप्नाचा फायदा घेत एका भामट्याने या कुटुंबाला तब्बल साडेपाच लाखांचा गंडा घातला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रवेशाचं आमिष अन् 50 लाखांचं बजेट
ही फसवणूक ६ एप्रिल २०२४ पासून २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडली. आरोपी शरणगौड (रा. कर्नाटक) याने बिरनारायण यांचा विश्वास संपादन केला. "तुमच्या मुलीला कर्नाटक येथील एका नामांकित महाविद्यालयात पायलट कोर्ससाठी प्रवेश मिळवून देतो," असे आमिष त्याने दाखवले. या संपूर्ण कोर्ससाठी ५० लाख रुपये खर्च येईल, असे सांगून त्याने टप्प्याटप्प्याने बिरनारायण यांच्याकडून ५ लाख ४५ हजार रुपये उकळले.
advertisement
दोन वर्षं फक्त आश्वासनं आणि फसवणूक
मुलीच्या उज्वल भविष्यासाठी वडिलांनी पै-पै जमा करून ही रक्कम आरोपीला दिली. मात्र, पैसे घेऊनही प्रवेश मिळत नसल्याचे पाहून सिंग यांना संशय आला. गेल्या दोन वर्षांपासून आरोपी फक्त तारखा देत होता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बिरनारायण सिंग यांनी मंगळवारी (२४ फेब्रुवारी) पोलिसांत धाव घेतली.
advertisement
दिघी पोलिसांनी या प्रकरणी शरणगौड विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एजंटच्या सांगण्यावर विश्वास ठेवून लाखो रुपये देण्यापूर्वी पालकांनी महाविद्यालयात जाऊन खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. स्वप्न पूर्ण करण्याच्या ओढीत एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कष्टाची कमाई गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
लेकीला पायलट व्हायचं होतं; वडिलांनीही दिली साथ, पण पुण्यातील 'त्या' कुटुंबासोबत 2 वर्षात भयंकर घडलं
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement