Winter Care : हिवाळ्यात सांधे जास्त का दुखतात ? या व्यायामांनी पडेल फरक, व्यायाम करा, फिट राहा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
संधिवात, गुडघ्यातील कमकुवतपणा किंवा जुन्या दुखापतींनी ग्रस्त असलेल्यांसाठी, हिवाळा ऋतू म्हणजे आव्हान असतं. गुडघ्यांच्या समस्या केवळ वृद्धांमध्येच दिसून येत नाहीत, तर तरुणांमध्येही दिसून येतात. पण थंडीत सांधेदुखी का वाढते? यामागे केवळ वयच नाही तर अनेक वैज्ञानिक आणि शारीरिक कारणं देखील जबाबदार आहेत.
मुंबई : हिवाळ्यात गारवा जसजसा वाढतो तसा अनेकांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरु होतात. काहींना अंगावर रॅश येणं, त्वचा कोरडी होणं असे त्रास जाणवतात तर काहींना सांधेदुखीचा त्रास जाणवतो किंवा ज्यांना त्रास आहे तो वाढतो.
हिवाळ्यात अनेकजण सांधेदुखी वाढल्याची तक्रार करतात. थंडीमुळे गुडघे कडक होणं, खांदे कडक होणं, पाठदुखी आणि बोटांमध्ये वेदना वाढतात.
संधिवात, गुडघ्यातील कमकुवतपणा किंवा जुन्या दुखापतींनी ग्रस्त असलेल्यांसाठी, हिवाळा ऋतू म्हणजे आव्हान असतं. गुडघ्यांच्या समस्या केवळ वृद्धांमध्येच दिसून येत नाहीत, तर तरुणांमध्येही दिसून येतात. पण थंडीत सांधेदुखी का वाढते? यामागे केवळ वयच नाही तर अनेक वैज्ञानिक आणि शारीरिक कारणं देखील जबाबदार आहेत.
advertisement
थंड हवामानामुळे गुडघेदुखी वाढू शकते - आरोग्य तज्ज्ञांच्या मते, थंड हवामानात रक्ताभिसरण मंदावतं, ज्यामुळे सांध्यामधे कडकपणा आणि सूज वाढू शकते. काही सोपे आणि प्रभावी व्यायाम दररोज केल्यानं सांधेदुखी कमी होऊ शकते.
गुडघेदुखी कमी करण्यासाठी, सरळ पाय उचलण्याचा म्हणजेच स्ट्रेट-लेग लिफ्ट एक्सरसाइज व्यायाम करून पहा. पाठीवर झोपा आणि एक पाय सरळ वर करा, यामुळे मांड्या मजबूत होतात आणि वेदना कमी होण्या्स मदत होते.
advertisement
सिंगल हॅमस्ट्रिंग स्ट्रेच - सांधेदुखी कमी करण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. बसून किंवा आडवं पडून हा व्यायाम करता येतो. एक पाय सरळ पुढे वाकून किंवा भिंतीला टेकून हा व्यायाम केला जाऊ शकतो. या स्थितीत वीस-तीस राहा सेकंद धरा आणि नंतर दुसऱ्या पायानंही असाच व्यायाम करा.
एंकल स्ट्रेचिंग एक्सरसाइज म्हणजेच घोट्याच्या स्नायूंना ताणण्याचे व्यायाम - सांधेदुखीचा त्रास होत असेल तर घोट्याच्या ताणण्याचे म्हणजेच एंकल स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा. वेदना कमी करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.
advertisement
स्ट्रेट-लेग पिरिफॉर्मिस स्ट्रेच एक्सरसाइज - गुडघेदुखी कमी करण्यासाठी, पाय सरळ ठेवून बसा किंवा पाठीवर झोपा आणि पाय वर करा आणि गुडघे वाकवा. या व्यायामामुळे आराम मिळेल.
या व्यायामांव्यतिरिक्त इतरही व्यायामांमुळे वेदनांपासून आराम मिळतो. पाहूयात काही योगासनं
advertisement
त्रिकोनासन
मालासन
पार्श्वोत्तनासन
पवनमुक्तासन
वज्रासन
बालासन
हे सर्व उपाय आहेतच पण तरीही वेदना तीव्र राहिली तर डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घेणं आवश्यक आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 8:35 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Care : हिवाळ्यात सांधे जास्त का दुखतात ? या व्यायामांनी पडेल फरक, व्यायाम करा, फिट राहा










