Solpaur: हातात सोन्याचं कडं, 5 अंगठ्या अन् गळ्यात माळा, भावी नगरसेवक पोस्ट अन् घरात आढळला मृतदेह, सोलापूर हादरलं
- Published by:Sachin S
Last Updated:
सोलापुरातल्या लष्कर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. अय्युब सय्यद असं मृत्यू झालेल्या पारलिंगी समुदायाच्या व्यक्तीचं नाव आहे.
प्रितम पंडित, प्रतिनिधी
सोलापूर : राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक इच्छुक उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. अशातच सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या एका उमेदवाराची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मारेकरी पळून जाताना दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापुरातल्या लष्कर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. अय्युब सय्यद असं मृत्यू झालेल्या पारलिंगी समुदायाच्या व्यक्तीचं नाव आहे. अय्युब सय्यद हे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 16 मधून निवडणुकीसाठी इच्छुक होते. मागील काही दिवसांपासून ते निवडणुकीच्या तयारीला लागले होते. आपल्या इंन्साटाग्राम अकाऊंटवर त्यांनी निवडणूक लढवणार असल्याच्या पोस्ट सुद्धा शेअर केल्या होत्या. त्यांच्या या व्हिडीओ आणि फोटोला इंस्टाग्राम अकाउंटवर लाखोंच्या संख्येनं views आले आहेत.
advertisement
सीसीटीव्हीमध्ये दिसले मारेकरी?
मात्र, शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास अयुब सय्यद यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. हत्येच्या एका सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये रात्री 11.30 वाजेच्या सुमारास तीन अनोळखी इसम हे अय्युब सय्यद यांच्या घरात प्रवेश करत होते. तेच तीन इसम रात्री 2 च्या सुमारास परत जाताना दिसत आहे. मात्र, घटना घडून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी हा सगळा प्रकार समोर आला. आज दुपारी अय्युब सय्यद यांची मृत्यूची घटना उघडकीस आली होती.
advertisement
हत्या कशासाठी?
view commentsघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अय्युब सय्यद यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर या परिसरातील कॅमेरे तपास असता हत्येचा प्रकार समोर आला. या अज्ञात तीन इसमानीच अय्युब यांची हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या तीन संशयित आरोपीचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, अय्युब यांची हत्या नेमकी कशामुळे झाली याचा तपास देखील सोलापूर शहर पोलीस करत आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 11:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solpaur: हातात सोन्याचं कडं, 5 अंगठ्या अन् गळ्यात माळा, भावी नगरसेवक पोस्ट अन् घरात आढळला मृतदेह, सोलापूर हादरलं








