Gold : 22 कॅरेट की 24 कॅरेट, कोणतं सोनं गुंतवणूकीसाठी चांगलं? तुम्हाला पण असाच प्रश्न पडलाय? मग आता होईल कन्फ्यूजन दूर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
22K vs 24K gold Which is better for investment : अनेकांना वाटतं की 24 कॅरेट म्हणजे सर्वात शुद्ध सोनं, मग 22 कॅरेट कशासाठी? गुंतवणुकीसाठी नक्की कोणतं सोनं फायद्याचं ठरेल? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हा खास रिपोर्ट तयार केला आहे.
भारतात सोनं हे केवळ एक दागिना नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा आणि कुटुंबाचा आधार मानला जातो. मुलीचं लग्न असो, दिवाळीची खरेदी असो वा संकटकाळी मदतीचा हात, आपण सर्वात आधी सोन्याचा विचार करतो. पण जेव्हा आपण सोन्याच्या दुकानात जातो, तेव्हा सराफ आपल्याला विचारतो की "22 कॅरेट (22K) हवंय की 24 कॅरेट (24K)?" कधीकधी तर सोनारच सजेस्ट करतात की तुम्ही 22 कॅरेट सोनंच घ्या. पण अशावेळी अनेकदा लोक कन्फ्यूज होतात की नक्की करायचं काय? किंवा कोणती डिल फायद्याची?
advertisement
advertisement
advertisement
24 कॅरेट (24K Gold) - 99.9% शुद्धहे सोन्याचं सर्वात शुद्ध रूप आहे. यात इतर कोणत्याही धातूची भेसळ नसते. हे सोनं खूप मऊ (Pliable) असतं आणि त्याचा रंग गडद पिवळा असतो.ते इतकं मऊ असल्यामुळे यापासून नाजूक दागिने बनवता येत नाहीत, कारण ते सहज वाकले जाऊ शकतात. याचा वापर प्रामुख्याने सोन्याची नाणी आणि बिस्किटे (Gold Bars) बनवण्यासाठी होतो.
advertisement
2. 22 कॅरेट (22K Gold) - 91.6% शुद्धआपण दागिन्यांच्या दुकानात जे सोनं पाहतो, ते बहुधा 22 कॅरेटचं असतं. यात 91.6 % सोनं आणि उरलेलं 8.4% तांबे, जस्त किंवा निकेल यांसारखे धातू मिसळले जातात. इतर धातूंच्या मिश्रणामुळे हे सोनं कडक आणि टिकाऊ बनतं.वापर: लग्नाचे जड दागिने, बांगड्या किंवा चैन बनवण्यासाठी 22 कॅरेट हेच सर्वात उत्तम मानलं जातं. यालाच '916 हॉलमार्क' असंही म्हणतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









