पश्चिम रेल्वेवरील मुंबईतल्या 'या' स्थानकावर उभारणार देशातलं पहिलं को-वर्किंग स्पेस, प्रवाशांना काय मिळणार सुविधा?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना को- वर्किंग स्पेसची सुविधा मिळणार आहे. अत्याधुनिक डिजिटल लाऊंज आणि को- वर्किंग सुविधेचा उद्देश प्रवाशांना त्यांच्या ट्रेनची वाट पाहत असताना आरामदायी आणि व्यावसायिक वातावरणात काम करण्याचा पर्याय प्रदान करणे आहे.
नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी आहे, आता नोकरदार वर्गाला फक्त ऑफिसमध्ये आणि घरीच नाही तर, प्रवासातही काम करायला मिळणार आहे. पश्चिम रेल्वेकडून हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला असून महसूलमध्ये वाढ होण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देणे, शिवाय प्रवाशांच्या तिकिटाच्या पैशांच्या माध्यमातून महसूल वाढवण्याबरोबरच पश्चिम रेल्वेने एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. तो म्हणजे, पश्चिम रेल्वेवरील एका प्रमुख स्थानकावर वर्किंग स्पेस सुरू करण्यात आले आहे. असे उपक्रम हाती घेतलेले हे पहिलेच रेल्वे स्थानक आहे.
हे रेल्वे स्थानक दुसरे- तिसरे कोणतेही नसून मुंबई सेंट्रल (Bombay Central) स्थानक आहे. असा अनोखा उपक्रम करणारा हे पहिलेच रेल्वे स्थानक आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना को- वर्किंग स्पेसची सुविधा मिळणार आहे. अत्याधुनिक डिजिटल लाऊंज आणि को- वर्किंग सुविधेचा उद्देश प्रवाशांना त्यांच्या ट्रेनची वाट पाहत असताना आरामदायी आणि व्यावसायिक वातावरणात काम करण्याचा पर्याय प्रदान करणे आहे. रेल्वे स्टेशन परिसरामध्ये को- वर्किंग स्पेसची सुविधा तब्बल 1700 स्क्वेअर फूट परिसरात विकसित करण्यात येणार आहे. हा संपूर्ण परिसर वातानुकूलित असणार असून 58 व्यक्ती बसू शकतील, इतकी आसन व्यवस्था केली जाणार आहे.
advertisement
रेल्वे स्टेशनवर प्रवाशांकरिता आधुनिक आणि आरामदायी वर्कस्टेशन्स तयार करण्यात आली आहेत. ज्यामुळे ते कोणत्याही अडथळ्याशिवाय आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतील. को-वर्किंग स्पेसमध्ये रिक्लाइनर खुर्च्या, हाय-स्पीड वाय- फाय, बरेच मोबाइल आणि लॅपटॉप चार्जिंग पॉइंट्स, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा आणि स्वतंत्र बैठक कक्ष यांचा समावेश असणार आहे. रेल्वेकडून प्रवाशांना इतरत्र सुविधा देखील दिल्या जाणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी चहा- कॉफीचे शॉप्स, आधुनिक- क्लिन वाशरूम सारख्या प्रमुख सुविधा देण्यात येणार आहे. खरंतर, या सुविधा व्यावसायिक प्रवाशांना दिल्या जाणार आहेत.
advertisement
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, अशा सुविधा रेल्वे स्थानकांना केवळ प्रवासाचे ठिकाण म्हणून नव्हे तर बहुउपयोगी जागा म्हणून विकसित करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. हे वैशिष्ट्य विशेषतः व्यावसायिक प्रवासी, व्यावसायिक आणि राजधानी आणि वंदे भारत सारख्या प्रिमियम ट्रेनमध्ये प्रवास करणार्यांसाठी उपयुक्त ठरेल. पश्चिम रेल्वे, को- वर्किंग स्पेसचा वापर करण्यासाठी एका तासासाठी 200 रूपये शुल्क आकारले जाईल. त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त तासासाठी 150 रूपये शुल्क आकारले जाईल. रेल्वेला आशा आहे की या उपक्रमाचा प्रवाशांना अधिकाधिक फायदा होणार असून प्रवाशांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय असेल. मुंबई सेंट्रल स्थानकावरील जर हा प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात इतर प्रमुख रेल्वे स्थानकांवरही तो लागू केला जाऊ शकतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 3:04 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
पश्चिम रेल्वेवरील मुंबईतल्या 'या' स्थानकावर उभारणार देशातलं पहिलं को-वर्किंग स्पेस, प्रवाशांना काय मिळणार सुविधा?










