VIDEO : थोडक्यात वाचला Ben Stokes! स्टार्क जिवावरच उठला, तोच बॉल ज्याने घेतला होता फिल ह्यूज जीव
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ben Stokes Helmet save him : इंग्लंडचा पहिला डाव सुरू असताना कॅप्टन बेन स्टोक्स मैदानात होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क बॉलिंग करत होता. क्रीजवर बेन स्टोक्स पाय रोवून उभा होता.
Aus vs Eng Ashes Test : ऐतिहासिक अॅशेस मालिकेतील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या अॅशेस कसोटी सामन्याचा तिसरा दिवस सुरू आहे. दुसऱ्या डावात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत ऑस्ट्रेलियाने 88 धावा केल्या आहेत. सध्या ट्रॅव्हिस हेड आणि उस्मान ख्वाजा क्रीजवर आहेत. मात्र, या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अशी घटना घडली, ज्यामुळे दोन मिनिटांसाठी सर्वांचाच श्वास रोखला गेला होता.
एक बाउन्सर 145 किलोमीटर स्पीडने आला अन्...
इंग्लंडचा पहिला डाव सुरू असताना कॅप्टन बेन स्टोक्स मैदानात होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क बॉलिंग करत होता. क्रीजवर बेन स्टोक्स पाय रोवून उभा होता, त्यामुळे स्टार्क काहीसा त्रस्त होता. अशातच स्टार्कने 145 किलोमीटर वेगाने एक बाउन्सर बॉल टाकला. हा वेगाचा मारा इतका अनपेक्षित होता की, स्टोक्सने स्वतःला वाचवण्यासाठी खाली झुकण्याचा प्रयत्न केला, पण बॉल थेट त्याच्या हेल्मेटच्या मागील भागावर जाऊन आदळला.
advertisement
मोठा अनर्थ टळला
हेल्मेटवर बॉल बसताच मैदानावर शांतता पसरली होती, मात्र स्टोक्सने लेटेस्ट मॉडेलचे हेल्मेट घातल्याने मोठा अनर्थ टळला. या हेल्मेटला मागील बाजूने विशेष प्रोटेक्शन देण्यात आले होते, ज्यामुळे गंभीर दुखापत झाली नाही. जर हे हेल्मेट जुन्या प्रकारचे असते, तर या घटनेचा परिणाम खूप भयंकर असू शकला असता. या थरारक अनुभवानंतर क्रीडा विश्वात आधुनिक उपकरणांच्या महत्त्वावर चर्चा होत असून, बेन स्टोक्स सध्या सुरक्षित आहे.
advertisement
The same ball which k¡IIed Phil Hughes in 2013 but a different helmet which saved Ben Stokes today. pic.twitter.com/FsQ1Vi9Ihr
— Dive (@crickohlic) December 18, 2025
फिल ह्यूजचा मृत्यू
दरम्यान, 2013 मध्ये एका शेफील्ड शिल्डमध्ये मॅचमध्ये शॉन अॅबॉट बॉलिंग करत असताना फिल ह्यूजेसच्या डोक्यावर बाउन्सर लागला. त्यामुळे तो तो जमिनीवर बेशुद्ध पडला. त्याचे डोळे घट्ट बंद झाले आणि पुन्हा कधीही उघडले नाहीत. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, परंतु ह्यूजेसला वाचवता आलं नाही. या घटनेने संपूर्ण क्रिकेट जगत हादरलं होतं. त्यानंतर आता बेन स्टोक्स थोडक्यात वाचल्याचं पहायला मिळालं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 9:24 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : थोडक्यात वाचला Ben Stokes! स्टार्क जिवावरच उठला, तोच बॉल ज्याने घेतला होता फिल ह्यूज जीव










