'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा निर्माता हरपला, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं निधन
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
भारतीय शिल्पकलेला जागतिक ओळख मिळवून देणारे नेणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं निधन झालं आहे.
भारतीय शिल्पकलेला जागतिक ओळख मिळवून देणारे नेणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या १०१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सुतार यांच्या जाण्याने भारतीय कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जाणारा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' (सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा) राम सुतार यांनीच साकारला होता.
राम सुतार यांचं नोएडा येथील निवासस्थानी निधन झालं आहे. आज सकाळी अकरा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या राम सुतार यांनी संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आणि अनेक ऐतिहासिक स्मारके आपल्या कौशल्याने जिवंत केली. त्यांच्या निधनामुळे कला क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
advertisement
शिल्पकार राम सुतार हे इंदू मीलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे शिल्पकार होते. राम सुतार यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील गुंडूर या गावी १९२५ साली झाला. त्यांना लहान पणापासून शिल्पकलेची आवड होती. सुरुवातीला त्यांना श्री राम कृष्ण जोशी यांचं मार्गदर्शन लाभलं होतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिल्पकलेचे धडे गिरवल्यानंतर या कलेबाबत त्यांची गोडी आणखी वाढत गेली. यातूनच त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. इथं त्यांनी आपल्या शिल्पकलेला एक वेगळीच धार दिली.
advertisement
इथं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ माहिती दूरसंचार विभागात काम केलं. पण त्यांनी काही दिवसातच ही नोकरी सोडली. यानंतर त्यांनी दिल्लीत स्वत:चा स्टुडिओ सुरू केला होता. मागच्या सहा-सात दशकात त्यांनी देशभरात अनेक ऐतिहासिक पुतळे उभारले आहेत.
view commentsLocation :
Noida,Gautam Buddha Nagar,Uttar Pradesh
First Published :
December 18, 2025 8:35 AM IST









