advertisement

अंबरनाथ हादरलं! भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दोघे आले अन्....

Last Updated:

अंबरनाथमध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर अज्ञातांनी गोळीबार केला, सुरक्षारक्षक जखमी. सीसीटीव्हीमध्ये घटना कैद, पोलिसांचा तपास सुरू. शहरात भीतीचे वातावरण.

News18
News18
नगर परिषदेच्या मतदानाच्या दोन दिवस आधीच दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्याच उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अंबरनाथ शहरात भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली.
मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही घटना मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. अंबरनाथ पश्चिम भागातील शंकर मंदिर परिसरात पवन वाळेकर यांचे कार्यालय आहे.
दोन अज्ञात इसम दुचाकीवरून आले आणि त्यांनी अचानक कार्यालयाच्या दिशेने ४ राऊंड फायर केले. गोळीबाराचा आवाज ऐकून कार्यालयातील सुरक्षारक्षक बाहेर आले, हल्लेखोरांनी त्याच्या दिशेनेही गोळ्या झाडल्या. या भीषण हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गोळीबारात वाळेकर यांचा सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. भरवस्तीत अशा प्रकारे गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेची सर्व दृश्ये कार्यालयाबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
advertisement
घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली. या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. मतदानाच्या अवघ्या ४८ तास आधी उमेदवाराच्या कार्यालयावर झालेला हा हल्ला प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
अंबरनाथ हादरलं! भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दोघे आले अन्....
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement