IPL 2026: पराभवानंतर संजीव गोयंका भडकले, पंतला झाप झाप झापलं, मैदानातला VIDEO समोर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
लखनऊचे मालक संजीव गोयंका सामन्याच्या निकालावर निराश झाल्याचे दिसत होते. संजीव गोयंका यांना लखनऊचा झालेला पराभव अजिबात पटलेला दिसत नाही आहे.त्याच्या हावाभावावरून हे व्हिडिओत स्पष्ट दिसते आहे.
Sanjiv Goenka Chat with Rishabh pant VIDEO : आयपीएलमध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सूपर जाएटसचा 6 विकेटने पराभव केला होता.दिल्ली कॅपिटल्सच्या या विजयाचा शिल्पकार समीर रिझ्वी ठरला होता कारण त्याने 47 बॉलमध्ये 70 धावांनी मॅच विनिंग खेळी केली होती. खरं तर हा सामना लखनऊ सूपर जाएटस आरामात जिंकू शकली असती, पण कॅप्टन रिषभ पंतच्या काही चुंकामुळे टीमला या सामन्यात हार पत्करावी लागली होती. त्यामुळे लखनऊच्या या कामगिरीनंतर टीमचे मालक संजीव गोयंका हे रिषभ पंतवर भडकले होते. या संदर्भातला व्हिडिओ आता समोर आला आहे.
खरं तर लखनऊ सूपर जाएटसचे मालक संजीव गोयंका मॅच दरम्यान प्रचंड अॅक्टीव्ह असतात.मैदानात येऊन ते खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवत असतात.तसेच सामन्यानंतर देखील ते मैदानात येऊन खेळाडूंसोबत निकालावर चर्चा करत असतात. बुधवारी देखील लखनऊ सूपर जाएटसच्या पराभवानंतर लखनऊचे मालक संजीव गोयंका मैदानात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत लखनऊचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर देखील होते. या दोघांसोबत रिषभ पंत देखील होता.यावेळी तिघांमध्ये लखनऊ सूपर जाएटसच्या पराभवावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
advertisement
या चर्चे दरम्यान लखनऊचे मालक संजीव गोयंका सामन्याच्या निकालावर निराश झाल्याचे दिसत होते. संजीव गोयंका यांना लखनऊचा झालेला पराभव अजिबात पटलेला दिसत नाही आहे.त्याच्या हावाभावावरून हे व्हिडिओत स्पष्ट आहे. आणि रिषभ पंत या व्हिडिओमध्ये नेमका पराभव कसा झाला?याची कारणे सांगताना दिसत आहे. पण ही कारणे संजीव गोयंका यांना पटत नाही.
advertisement
Just look at Rishabh Pant’s face when Sanjiv Goenka questioned him just minutes after LSG’s loss to DC.
This is not good for the IPL. This is not good for any Indian player.
What’s your view on that? pic.twitter.com/GrPznG19gR
— Sonu (@Cricket_live247) April 2, 2026
advertisement
हा सगळा मैदानातला ड्रामा पाहून अनेकांना केएल राहुलची आठवण झाली आहे.कारण केएल राहुल ज्यावेळेस लखनऊ सूपर जाएटसचा कर्णधार होता,त्यावेळेस देखील पराभवानंतर बाऊंन्ड्री लाईनवर त्याला फटकारले होते. या भांडणाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.त्यामुळे संजीव गोयंका हे त्यांच्या कर्णधारांना नेहमीच झापतात असे मागचे हंगामात दिसले आहे. पण यंदा गोयंका यांची शिकार हा रिषभ पंत ठरला होता.त्यामुळे पंतचा आता व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 4:47 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026: पराभवानंतर संजीव गोयंका भडकले, पंतला झाप झाप झापलं, मैदानातला VIDEO समोर







