advertisement

Simhastha Kumbh Mela 2027: सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दी व्यवस्थापनासाठी रेल्वेचा नवा मास्टरप्लॅन, कुठे- कुठे भाविकांसाठी सुविधा वाढवणार?

Last Updated:

नाशिक कुंभमेळ्यासाठी भाविकांची गर्दी लक्षात घेता रेल्वेने नवा मास्टरप्लॅन तयार केलेला आहे. भाविकांना सुविधा वाढवण्यासाठी नवा प्लॅन तयार केला जात आहे.

News18
News18
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांची संख्या लक्षात घेता, रेल्वेकडून नाशिक जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांची सुविधा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकसह इतर काही रेल्वे स्थानकांचीही क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कुंभमेळ्यासाठी भाविकांची गर्दी लक्षात घेता प्लॅटफॉर्म्सचा विस्तार, अतिरिक्त थांबे आणि प्रवाशांसाठी होल्डिंग एरिया या सुविधा दिल्या जाणार आहेत. या प्रमुख गोष्टींच्या माध्यमातून नाशिकचा कायापालट केला जात आहे. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी बुधवारी सर्व कामांचा आढवा घेतला.
कुंभमेळा प्राधिकरणाच्या आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे, खेरवाडी, ओढा आणि देवळाली या रेल्वे स्थानकांची पाहणी केली. रेल्वे विभाग आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने पाहणी करत पायाभूत सुविधांची स्थिती आणि प्रवासी हाताळणी क्षमतेचा आढावा सुद्धा या ठिकाणी घेण्यात आला. शिवाय, जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांच्या परिसरात स्वच्छता, साफसफाई, कचरा व्यवस्थापन, शौचालयाची देखभाल आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता यांसह अनेक गोष्टींवर भर दिला जाणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी स्टेशन परिसरात अतिरिक्त पाण्याची सुविधा उभारली जाणार आहे.
advertisement
कुंभमेळा प्राधिकरणाच्या आयुक्तांसोबत देवळाली रेल्वे स्थानकाची पाहणी करताना कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळालीचे अध्यक्ष ब्रिगेडियर एन. आर. पांडे सुद्धा उपस्थित होते. यासह इतरत्र प्रमुख अधिकारीही उपस्थित होते. "भाविकांचा लक्षणीय आकडा लक्षात घेता, पायाभूत सुविधांची उभारणी करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा, गर्दीचं व्यवस्थापन आणि सर्व यंत्रणांमधील समन्वय या गोष्टी आवश्यक आहे. आजच्या पाहणीमुळे स्थानिक पातळीवरील गरजा स्पष्ट झाल्या असून त्या वेळेत पूर्ण करून भाविकांना सुरक्षित आणि उत्कृष्ट प्रवासाचा अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया कुंभमेळा प्राधिकरणाच्या आयुक्तांनी केलेली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Simhastha Kumbh Mela 2027: सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दी व्यवस्थापनासाठी रेल्वेचा नवा मास्टरप्लॅन, कुठे- कुठे भाविकांसाठी सुविधा वाढवणार?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement