advertisement

Weather Alert: 17 डिसेंबरला हवामानात मोठे बदल, मुंबई-पुण्यासाठी पुन्हा अलर्ट, मराठवाड्यात काय स्थिती?

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील 17 डिसेंबरचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/5
डिसेंबर महिन्यात देखील राज्यातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. उत्तरेतील शीतलहरींमुळे निर्माण झालेली थंडीची लाट काही प्रमाणात ओसरली आहे. तरीही बहुतांश भागात गारठा कायम आहे. 17 डिसेंबर रोजी मुंबई, पुण्यासह राज्यातील हवामान अंदाज जाणून घेऊ.

2/5
मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवर आज सकाळी तापमान साधारण 20 ते 22 अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले. कालच्या तुलनेत थंडीमध्ये विशेष वाढ झालेली नाही. दिवसा तापमान 31 ते 32 अंशांपर्यंत पोहोचत असल्याने उन्हाची तीव्रता जाणवत आहे. समुद्राकडून येणाऱ्या दमट हवेमुळे या भागांत थंडीचा प्रभाव कमीच राहिला आहे.

3/5
ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण परिसरातही हवामान जवळपास कालसारखेच आहे. पहाटे हलकी थंडी जाणवते, मात्र किमान तापमान 18 ते 20 अंशांच्या आसपासच आहे. दिवसा तापमान वाढून 31 अंशांच्या आसपास राहणार असल्याने उबदार हवामानाचा अनुभव येत आहे. पुढील काही दिवसांत या भागांत मोठा बदल होण्याची शक्यता नाही.

4/5
पुणे शहरात आज सकाळी गारवा जाणवला असला तरी थंडीचा जोर फारसा नाही. किमान तापमान सुमारे 14 ते 15 अंशांच्या आसपास राहिले असून कालच्या तुलनेत यात मोठा बदल झालेला नाही. मागील आठवड्यात जाणवलेली तीव्र थंडी सध्या कमी झाली आहे. दिवसा तापमान 29 ते 30 अंशांपर्यंत वाढत असल्याने दुपारच्या वेळेत उबदार हवामान जाणवत आहे.

5/5
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात रात्री काही भागांत गारवा जाणवतो, मात्र दिवसा तापमानात वाढ होत आहे. किमान तापमान 12 ते 15 अंशांच्या दरम्यान असून कालच्या तुलनेत फारसा फरक नाही. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यभर हवामान कोरडे आणि तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे. एकंदरीत 17 डिसेंबर रोजी हिवाळा असूनही थंडी मर्यादितच आहे. सकाळी हलका गारवा आणि दिवसा उबदार हवामान अशीच स्थिती राज्यभर कायम राहणार आहे.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement