Mangesh Yadav Success Story: क्रिकेट प्रॅक्टीससाठी 70 KM पायपीट; ट्रक ड्रायव्हरचा मुलगा 2 तासांत करोडपती; RCB कडून IPL गाजवणार

Last Updated:
Success story Mangesh Yadav : मंगेश यादव याने संघर्षातून क्रिकेटमध्ये यश मिळवत RCB कडून 5 कोटी 20 लाख रुपयांना आयपीएल 2026 मध्ये निवड मिळवली, वडील रामअवध यादव यांच्या कष्टाला मान्यता मिळाली.
1/8
लहानपणापासून गरीबी पाहिली, जगण्यासाठी संघर्ष, घरात आधीच पैसे कमी त्यामुळे फार स्वप्न पूर्ण होतील याची शाश्वती नसताना वडिलांनी मात्र खंबीर आधार दिला. वडिलांनी मुलाच्या पाठीवर हात ठेवला आणि क्रिकेट खेळण्यासाठी बळ दिलं. वडील ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतात. घरात फार बेताची आर्थिक परिस्थिती असल्याने सुखसोई फार नाहीतच.

advertisement
2/8
बारावीपर्यंत शिक्षण घेता आलं. क्रिकेटची प्रॅक्टीस करण्यासाठी 70 किमी रोज पायपीट करावी लागत होती. हे सगळं असताना अचानक आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनने मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील एका छोट्या गावाचा मुलगा एका रात्रीत देशभरात चर्चेत आला.

3/8
24 वर्षीय वेगवान गोलंदाज मंगेश यादव याची रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) टीमने तब्बल 5 कोटी 20 लाख रुपयांना आपल्या टीममध्ये समाविष्ट करून घेतलं. यामुळे त्यांचं संपूर्ण  आयुष्यच बदलून  जाणार आहे. अवघ्या 30 लाख रुपयांच्या बेस प्राइसपासून सुरू झालेला हा प्रवास मंगेशसाठी स्वप्नपूर्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल आहे.

4/8
ही केवळ मंगेशचीच नाही, तर त्याच्या ट्रक ड्रायव्हर वडील रामअवध यादव यांच्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी आहे. मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी रामअवध यादव यांनी महिनोन्‌महिने घरापासून दूर राहून ट्रक चालवला. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत, मुलाच्या स्वप्नासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य ट्रक चालवून, बाहेर राहून घालवलं. त्या कष्टांचं फळ अखेर अबू धाबीतील आयपीएल लिलावात मिळालं.

5/8
मंगेश यादव आपल्या वेग, अचूक यॉर्कर आणि धडाकेबाज बॉलिंगसाठी ओळखला जातो. मध्य प्रदेश टी-20 लीगमध्ये त्याने केलेली कामगिरी निवड समित्यांचं लक्षवेधी ठरली. सहा सामन्यांत 14 विकेट्स, त्यात तीन वेळा चार विकेट्सची कामगिरी आणि एका सामन्यात तीन ओव्हरमध्ये अवघ्या 18 धावांत चार गडी बाद करण्याची कामगिरी, ह्या सगळ्याचं चीज या आयपीएल मिनी ऑक्शनमध्ये झालं.

6/8
याच वर्षी मंगेशने सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मध्य प्रदेशकडून पदार्पण केलं. दोन सामन्यांत तीन विकेट्स घेतल्या, शिवाय फलंदाजीतही 12 चेंडूंमध्ये 28 धावांची उपयुक्त खेळी करत त्याने स्वतःला अष्टपैलू खेळाडू म्हणून सिद्ध केलं. मंगेशचा जन्म 10 ऑक्टोबर 2002 रोजी पांढुर्णा जिल्ह्यातील बोरगाव येथे झाला. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही त्याने क्रिकेटची स्वप्नं सोडली नाहीत. त्याचा सरावाचा प्रवासही संघर्षाने भरलेला होता.

7/8
 वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवत मंगेश दररोज तब्बल 70 किलोमीटरचा प्रवास करून छिंदवाड्यातील इंदिरा गांधी क्रिकेट स्टेडियममध्ये सरावासाठी जात असे. कोच उत्सव बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने स्वतःला घडवत ठेवलं.

8/8
मंगेशच्या आयपीएल निवडीची बातमी कळताच त्याच्या वडिलांचा आनंद शब्दात मावणारा नव्हता. घरात आनंदाचं वातावरण असून, गावातही अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. वरिष्ठ काँग्रेस नेते नकुलनाथ यांनीही मंगेशच्या वडिलांशी बोलताना त्यांना शुभेच्छा दिल्या. मंगेशच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. वडिलांच्या डोळ्यात आनंद होता.

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement