T20 World Cup सुरू असताना वाईट बातमी! रिंकु सिंगनंतर आणखी एका स्टार खेळाडूच्या वडिलांचं निधन
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Kumar Sangakkara father passed away : टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्या वडिलांचं निधन झालं होतं. अशातच आता आणखी एका माजी खेळाडूच्या वडिलांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
Kumar Sangakkara father passed away : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या शेवटाला आता सुरूवात झाली आहे. अखेरची तीन सामने बाकी असून स्पर्धा अधिक रंजक झालीये. अशातच आता सध्या भारत आणि श्रीलंकेच्या मैदानांवर टी-20 वर्ल्ड कप 2026 चा थरार सुरू असतानाच क्रिकेट विश्वातून एक अत्यंत दुखद बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्या वडिलांचं निधन झालं होतं. अशातच आता आणखी एका माजी खेळाडूच्या वडिलांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
कुमार संगकारावर दु:खाचा डोंगर
भारतीय खेळाडू रिंकू सिंगनंतर आता श्रीलंकेचा महान विकेटकीपर बॅटर कुमार संगकारा याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुमारा संगकारा यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा समालोचक होता. संगकाराचे वडील क्षेमा संगकारा यांचे 3 मार्च रोजी निधन झाले असून, ही बातमी समजताच वर्ल्ड कपमध्ये कॉमेंट्री सोडून संगकारा तातडीने आपल्या घरी रवाना झाला आहे. क्षेमा संगकारा हे कँडी येथील एक प्रसिद्ध वकील होते आणि 4 मार्च रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
advertisement
डोक्यावरील पितृछत्र हरपलं
कुटुंबियांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, क्षेमा संगकारा हे त्यांच्या सर्व परिचितांसाठी एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व होते आणि त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, संगकारापूर्वी भारतीय क्रिकेटर रिंकू सिंगच्या वडिलांचे, खानचंद सिंह यांचेही नुकतेच निधन झाले आहे. गेल्या आठवड्यातच रिंकूच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले असून, भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही लागोपाठ दुसरी चटका लावणारी बातमी आहे.
advertisement
संगाकारा समालोचनासाठी येईल
दरम्यान, रिंकूच्या वडिलांचे निधन सुपर 8 मधील भारत विरुद्ध झिम्बाब्वे मॅचनंतर झालं होतं, त्यानंतर तो चेन्नईहून घरी परतला होता आणि पुन्हा टीम इंडियासोबत सामील झाला होता. अशातच आता कुमार संगाकारा वर्ल्ड कप फायनलआधी समालोचनासाठी येईल, अशी अपेक्षा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 12:39 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup सुरू असताना वाईट बातमी! रिंकु सिंगनंतर आणखी एका स्टार खेळाडूच्या वडिलांचं निधन








