BJP Rajya Sabha Candidate List: भाजपचं धक्कातंत्र! राज्यसभेसाठी दोन नवे चेहरे, कोण आहेत रामराव वडकुते आणि माया ईवनाते?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BJP Rajya Sabha Candidate List: धक्कातंत्राचा वापर करताना भाजपने चर्चेत असलेल्या अनेक नावांवर काट मारली. भाजपने पक्षाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांच्यासह दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.
मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील आपल्या ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. धक्कातंत्राचा वापर करताना भाजपने चर्चेत असलेल्या अनेक नावांवर काट मारली. भाजपने पक्षाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांच्यासह दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजपने रामराव वडकुते आणि माया ईवनाते यांना संधी दिली आहे.
विनोद तावडे, रामदास आठवले, माया चिंतामण ईवनाते, रामराव वडकुते यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे. भाजपकडून संधी देताना राजकीय अनुभव, पक्षनिष्ठा आणि प्रादेशिक प्रातिनिधित्वाचा विचार केलेला दिसतो. महाराष्ट्रातून राज्यसभेवर कुणाला संधी द्यावी, याबाबत भाजपच्या केंद्रीय समितीमध्ये दीर्घ चर्चा झाली. चर्चेअंती ४ नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
कोण आहेत मायाताई ईवनाते?
मायाताई इवनाते या भाजपच्या अत्यंत अभ्यासू आणि सक्रिय नेत्या मानल्या जातात. त्यांनी नागपूरचे महापौरपद भूषवले असून स्थानिक राजकारणात त्यांचा दांडगा अनुभव आहे. त्या 'राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या' (NCST) माजी सदस्या राहिल्या आहेत. या पदावर असताना त्यांना दिल्लीत राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला होता. महिला नेतृत्व, आदिवासी चेहरा आणि विदर्भातील प्रतिनिधित्व अशा तिन्ही आघाड्यांचा विचार करून भाजपने त्यांना उमेदवारी दिली असल्याची चर्चा आहे. आदिवासी समुदायामध्ये मायाताई यांचा मोठा प्रभाव असून, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगावर काम केल्यामुळे त्यांना दिल्लीतील कामकाजाचाही चांगला अनुभव आहे.
advertisement
कोण आहेत रामराव वडकुते?
रामराव वडकुते हे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत. २०१९ मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता. रामराव वडकुते यांनी हिंगोली विधानसभेतून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज होते.
advertisement
दरम्यान, वडकुते यांनी अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषवलं आहे. परभणी जिल्ह्यात धनगर प्रश्नांसाठी ते सुरुवातीपासून सक्रिय आहेत. त्यानंतर ते हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात कार्यरत राहिले
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 12:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP Rajya Sabha Candidate List: भाजपचं धक्कातंत्र! राज्यसभेसाठी दोन नवे चेहरे, कोण आहेत रामराव वडकुते आणि माया ईवनाते?









