शेतकऱ्यांना उन्हाळ्यात लखपती होण्याची मोठी संधी! या पिकातून ४५ दिवसांत कमवाल बक्कळ पैसा
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : उन्हाळ्यात पारंपरिक पिकांऐवजी भाजीपाला पिकांकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ‘आइसबर्ग लेट्यूस’ची शेती फायदेशीर पर्याय ठरत आहे.
मुंबई : उन्हाळ्यात पारंपरिक पिकांऐवजी भाजीपाला पिकांकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ‘आइसबर्ग लेट्यूस’ची शेती फायदेशीर पर्याय ठरत आहे. सॅलड, बर्गर आणि हॉटेल उद्योगात मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या या पिकाला शहरांमध्ये चांगला बाजारभाव मिळतो. योग्य नियोजन, ठिबक सिंचन आणि बाजारपेठेशी थेट जोडणी केल्यास एका एकरातून लाखो रुपयांची उलाढाल करणे शक्य असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
आइसबर्ग म्हणजे काय?
आइसबर्ग लेट्यूस ही गोल आकाराची, कुरकुरीत आणि थंड हवामानात वाढणारी पालेभाजी आहे. मात्र आधुनिक शेतीतंत्रामुळे उन्हाळ्यातही सावली जाळी (शेडनेट), मल्चिंग आणि ठिबक सिंचनाच्या मदतीने तिची यशस्वी लागवड करता येते. पुणे, नाशिक, सांगली, सोलापूर या भागांत काही प्रगत शेतकरी यशस्वी प्रयोग करत आहेत.
लागवड पद्धत
आइसबर्गची रोपे नर्सरीत तयार करून 25 ते 30 दिवसांनी शेतात लावली जातात. एका एकरात सुमारे 18 ते 22 हजार रोपे बसवता येतात. 45 ते 60 दिवसांत पीक तयार होते. ठिबक सिंचन, सेंद्रिय खते आणि संतुलित रासायनिक खतांचा वापर केल्यास दर्जेदार उत्पादन मिळते. उन्हाळ्यात तापमान नियंत्रणासाठी शेडनेटचा वापर केल्यास उत्पादनात घट होत नाही.
advertisement
१ एकरासाठी अंदाजे खर्च
आइसबर्ग शेतीसाठी प्रारंभीचा खर्च पारंपरिक पिकांपेक्षा थोडा जास्त असतो. एका एकरासाठी अंदाजे खर्च खालील असतो.
रोपे व नर्सरी खर्च : 40,000 रु ते 50,000 रु
जमीन तयारी व मल्चिंग : 30,000 रु ते 40,000 रु
ठिबक सिंचन व्यवस्था : 35,000 रु ते 45,000 रु
खते व औषधे : 25,000 रु ते 30,000 रु
advertisement
मजुरी व इतर खर्च : 30,000 रु ते 40,000 रु
एकूण अंदाजे खर्च : सुमारे 1.60 लाख रु ते 2 लाख रु
जर शेडनेट उभारायचे असेल तर अतिरिक्त 3 रु ते 4 रु लाखांचा भांडवली खर्च लागू शकतो. मात्र हा खर्च एकदाच करावा लागतो आणि पुढील अनेक हंगामात उपयोग होतो.
advertisement
उत्पादन व उत्पन्न
एका एकरातून सरासरी 12 ते 15 टन उत्पादन मिळू शकते. बाजारात दर्जानुसार आइसबर्गला 25 रु ते 50 रु प्रति किलो दर मिळतो. थेट हॉटेल, मॉल किंवा प्रोसेसिंग कंपन्यांशी करार केल्यास दर अधिक मिळू शकतो.
सरासरी दर 30 रु प्रति किलो धरला, तर 12 टन उत्पादनावर सुमारे 3.60 रु लाखांची उलाढाल होऊ शकते. चांगल्या दरात विक्री झाल्यास उत्पन्न 5 ते 6 लाखांपर्यंत जाऊ शकते. खर्च वजा जाता शेतकऱ्याला 1.5 ते 3 लाख रुपये निव्वळ नफा मिळू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 12:21 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांना उन्हाळ्यात लखपती होण्याची मोठी संधी! या पिकातून ४५ दिवसांत कमवाल बक्कळ पैसा









