advertisement

‎वर्दीतला सुरेल आवाज, नोकरी सांभाळून गातात गाणी, पोलीस अधिकारी अरुण यांचा अनोखा छंद, Video

Last Updated:

दिवसभर कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळताना ते जितके कठोर दिसतात, तितकेच मोकळ्या वेळेत ते संगीताच्या सुरांत रमलेले असतात. वर्दीची शिस्त आणि गाण्याची आवड यांचा सुंदर मेळ त्यांनी जपला आहे.

+
‎वर्दीतला

‎वर्दीतला सुरेल आवाज : पोलीस अधिकारी अरुण वाघ यांचा गाण्याचा अनोखा छंद

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातील अधिकारी अरुण वाघ हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. दिवसभर कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळताना ते जितके कठोर दिसतात, तितकेच मोकळ्या वेळेत ते संगीताच्या सुरांत रमलेले असतात. वर्दीची शिस्त आणि गाण्याची आवड यांचा सुंदर मेळ त्यांनी जपला आहे. आपल्या व्यस्त कामातून वेळ काढत गाण्याचा छंद जोपासणारे अरुण वाघ यांची ही वेगळी आणि प्रेरणादायी ओळख आहे.
शहरातील टीव्ही सेंटर भागात साखरे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे राहणारे अरुण वाघ. अरुण वाघ यांना तीन बहिणी. यातील सर्वात मोठी बहीण चंद्रलेखा यांना गाणे ऐकण्याचा आणि गाण्याचा छंद. मोठी बहीण सतत गाणे म्हणायची आणि तिचा आवाज लता मंगेशकर यांच्या प्रमाणे असायचा. बहिणीचे गाणे ऐकून अरुण यांना गाणी गाण्याचा छंद लागला.
advertisement
अरुण वाघ यांचं शालेय शिक्षण गावातच झालं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांना नाशिक येथील बहिणीच्या घरी. मित्रांनी तू छान गातोस त्यामुळे तू गाणं गा असा आग्रह धरला. मात्र अरुण यांना स्टेज डेरिंग नसल्यामुळे त्यांनी नकार दिला. मात्र गाणं गायलं नाही तर आम्ही बोलणार नाही असा दम मित्रांनी दिला. यामुळे मैत्री टिकवण्यासाठी त्यांनी गाणं गाण्यास होकार दिला आणि महाविद्यालयातील या स्पर्धेत त्यांचा दुसरा क्रमांक आला आणि यामुळेच त्यांना त्यांच्यातील गायकाची ओळख झाली. संगीत गुरू जे. आर. पुरी यांच्याकडे त्यांनी प्रशिक्षण घेतलं. मात्र नोकरीच्या वेळ निश्चित नसल्याने त्यांना पूर्ण प्रशिक्षण घेता आलं नाही.
advertisement
मी जेव्हा सेवानिवृत्त होईन. त्याच्यानंतर मी माझा गाण्याचा छंद पुढे जोपासणार आहे, गाण्याची क्लास घेणार आहे आणि भविष्यामध्ये गाण्याच्या माध्यमातून सामाजिक सेवा करण्याचा माझा संदेश असणार आहे, असं अरुण वाघ यांनी सांगितलं आहे.
view comments
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
‎वर्दीतला सुरेल आवाज, नोकरी सांभाळून गातात गाणी, पोलीस अधिकारी अरुण यांचा अनोखा छंद, Video
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement