advertisement

Ajit Pawar Plane Crash: 'कप्तान साबने ठोक दिया, अब...', भरपत्रकार परिषदेत रोहित पवारांनी ऑडिओ क्लिप ऐकवली

Last Updated:

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash: ज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा गौप्यस्फोट केला आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी डीजीसीएच्या AAIB च्या अहवालाची चिरफाड करत गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

 'कप्तान साबने ठोक दिया, अब...', भरपत्रकार परिषदेत रोहित पवारांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
'कप्तान साबने ठोक दिया, अब...', भरपत्रकार परिषदेत रोहित पवारांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा गौप्यस्फोट केला आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी डीजीसीएच्या AAIB च्या अहवालाची चिरफाड करत गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. त्याशिवाय, रोहित पवार यांनी व्हीएसआर या विमान कंपनीच्या इन्शुरन्स एजंटची ऑडिओ क्लिपच ऐकवली.
रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सातत्याने महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा अपघात आहे की घातपात आहे, याची माहिती समोर आली पाहिजे याची मागणी केली. आजच्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी गंभीर सवाल उपस्थित केले.
रोहित पवार यांनी म्हटले की, VSR कंपनीला कोण वाचवतंय असा प्रश्न निर्माण होत आहे. मी VSR कंपनीच्य विरोधात नाही.विमान सूरतला गेलं होतं ते रिपोर्टमध्ये आलं. ऑफिशियल लाइफपेक्षा 3000 तास पुढे गेलं होतं. व्हिजिबलीटी कमी होती ते रिपोर्टमध्ये सिद्ध आलं. मुख्य पायलट काहीच बोलत नव्हता हे देखील समोर आलं आहे. यापूर्वी आम्ही जे मुद्दे मांडले ते सगळे यामध्ये आहेत. अपघाताच्या अहवालात बारामतीला जिल्हा करून टाकला. त्याशिवाय, बारामती महानगरपालिका उल्लेख केला आहे.
advertisement

कुठं आहे ते झाड?

रोहित पवार यांनी म्हटले की, AIB रिपोर्टमध्ये खूप चुका आहेत. रिपोर्टमध्ये विमान झाडांना धडकून खाली पडलं, असं म्हटले. पण, अशी कुठली झाडं आहेत? आम्ही तेही तपासलं, तर तिथे झुडपं आहेत तिथे विमानाचा स्पर्श देखील झालं नाही. अहवालातील नोंदीप्रमाणे विमान आणि झुडुपाची उंची कुठेच मॅच होत नाही. रिपोर्ट द्यायचा म्हणून दिल किंवा झा़डांवर जबाबदारी ढकलली असं म्हणावं लागेल असेही रोहित पवारांनी म्हटले.
advertisement

रोहित पवारांनी ऐकवली ऑडिओ क्लिप...

रोहित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत व्हीएसआर कंपनीच्या इन्शुरन्स एजंटची ऑडिओ क्लिप ऐकवली. बारामतीमधील माळी कुटुंबााला हा फोन आला होता. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना वकिलांनी काय म्हटले हे रोहित पवारांनी ऐकवले.
advertisement
व्हीएसआर कंपनी इन्शुरन्स एजंट: कप्तान साहबने गलती कर दी...ठोक दिया जाके, क्या करोगे...
माळी कुटुंब: क्या गलती की?
व्हीएसआर कंपनी वकील: अगर वो पुणा चला जाते, व्हिजीबिलीटी खराब थी...दिखा नही...रनवे जिधर था, उसके लेफ्ट मे गये...अब ठोक दिया...क्या करोगे आप...
रोहित पवार यांनी म्हटले की, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत व्हीएसआर कंपनी, इन्शुरन्स एजंट किती हलक्यात घेत आहे हे दिसून येत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Plane Crash: 'कप्तान साबने ठोक दिया, अब...', भरपत्रकार परिषदेत रोहित पवारांनी ऑडिओ क्लिप ऐकवली
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement