advertisement

..तर ALL OK SIR चा मेसेज का पाठवला? रोहित पवारांकडून विमान अपघात अहवालाची चिरफाड, AAIB च्या चौकशीवर प्रश्नचिन्ह

Last Updated:

Ajit Pawar Plane Accident : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. अशातच रोहित पवार यांनी या अपघात प्रकरणी तिसरी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

Ajit pawar plane accident
Ajit pawar plane accident
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. अशातच रोहित पवार यांनी या अपघात प्रकरणी तिसरी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
मी व्हिएसआर आणि डिजीसीएच्या विरोधात नाही. सत्य बाहेर यावं यासाठी मी खटाटोप करत आहे.विमान सूरतला गेलं हे आम्ही म्हणत होतो.तेही अहवालात आले आहे. विमानात क्षमतेच्या ९० टक्के इंधन हे अहवालातही समोर आले आहे. अहवालात बारामतीला जिल्हा करून टाकलं आहे.एएआयबी आपल्या अहवाला बाबत किती सीरियस आहेत.हे यातून दिसून आले आहेत.
advertisement
विमान कोसळलं तिथे झाडे नव्हते
रोहित पवार पुढे म्हणाले की, जिथे विमान कोसळलं तिथे झाडे नव्हते.मात्र अहवालात तसं सांगण्यात आलं आहे. अहवालात तपास अधिकाऱ्याचे नाव का नाही? असाही सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
दुसरीकडे विमानाची रेकी करण्यासाठी काही लोक आले होते असं स्थानिकांचं म्हणणं आहे त्याची चौकशी करावी असं आमचं म्हणणं आहे. अजितदादांच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन टीमचं कुठेही नाव आलेलं नाही. असंही रोहित पवार म्हणाले आहेत.
advertisement
ALL OK SIR चा मेसेज का पाठवला?
मनोज पवार च्या मेसेज नुसार विदीप जाधव 7.17 ला पोहचले. 21 मिनिटाचा गॅप रिपोर्ट नुसार अजित दादा 7.59 ला विमानात बसले मनोज पवार च्या मेसेज नुसार - दादा 7.54 ला विमानात बसले. रिपोर्टनुसार – 7.21 वा. पायलटने walk around inspection केलं. तर मग मनोज पवार च्या मेसेजमध्ये 7.10 ला ALL OK SIR चा मेसेज का पाठवला? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
..तर ALL OK SIR चा मेसेज का पाठवला? रोहित पवारांकडून विमान अपघात अहवालाची चिरफाड, AAIB च्या चौकशीवर प्रश्नचिन्ह
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement