'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त 125CC मोटरसायकल! किंमत फक्त 82000 रुपयांपासून सुरू
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Cheapest 125cc Bikes in India: 125cc सेगमेंटमध्ये कोणती बाइक सर्वात स्वस्त, कुठे मिळते सर्वाधिक पॉवर आणि कोणाचं मायलेज भारी? तुम्हाला 1 लाख रुपयांहून कमी बजेटमध्ये स्टाइल, परफॉर्मेंस आणि बजत तिन्हीही हवे असेल तर हे बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
Cheapest 125cc Bikes in India: देशात 125cc सेगमेंटच्या बाइक्स यूथ आणि रोज प्रवास करणाऱ्यांमध्ये खुप प्रसिद्ध आहे. या बाइक्स फक्त परवडणाऱ्या नाहीत तर चांगला परफॉर्मेंस, मायलेज आमि स्टायलिश डिझाइनही प्रदान करते. 2026 मध्ये पेट्रोच्या वाढत्या किंमती आणि ट्रॅफिकच्या समस्या पाहता, अशा बाइक्स निवडणं खुप महत्त्वपूर्ण आहे ज्या बजेटमध्ये फीट बसतील आणइ चालवण्यात मजेदार वाटतील.
आज आपण तीन सर्वात परवडणाऱ्या 125cc बाइक्सची लिस्ट पाहणार आहोत या लिस्टमध्ये TVS Raider 125, Bajaj Pulsar 125 और Hero Xtreme 125R च्या नावांचा समावेश आहे. हा सर्व बाइक्स भारतीय बाजारात उपलब्ध आहेत आणि याच्या किंमती 82,000 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांच्या आसपास आहेत. चला किंमती-खासियतसह स्पेसिफिकेशन्स, फीचर्च आणि मायलेज डिटेल्सवर एक नजर टाकूया.
advertisement
TVS Raider 125
सध्याच्या काळात देशाची सर्वात स्वस्त 125 सीसी बाईक आहे. दिल्लीमध्ये याची एक्स-शोरुम किंमत 81,950 रुपयांपासून सुरु होते आणि टॉप व्हेरिएंटसाठी 97,719 रुपयांपर्यंत जाते. ही बाईक 124.8cc च्या एयर-कूल्ड इंजिनसह येते. जी 11.38 PS ची पॉवर आणि 11.2 Nm टॉर्क जनरेट करते. याचं मायलेज 56 ते 71.94 kmpl पर्यंत आहे. जे शहर आणि हायवे दोन्हीसाठी उपयुक्त आहे.
advertisement
रेडरमध्ये स्पोर्टी डिझाइन आहे, ज्यामध्ये एलईडी हेडलॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि टीव्हीएस कनेक्ट अॅप सपोर्टचा समावेश आहे. हे 5-स्पीड गिअरबॉक्ससह येते आणि त्याचे वजन 123 kg आहे. ज्यामुळे ते सहजपणे हँडल करता येते. फीचर्समध्ये इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर (ISG), इको आणि पॉवर मोड आणि सिंगल-चॅनल ABS (टॉप व्हेरिएंटमध्ये) समाविष्ट आहेत.
advertisement
Bajaj Pulsar 125
Bajaj Pulsar 125 कंपनीची पल्सर सीरीजमध्ये एंट्री-लेव्हल बाइक आहे. जी 2001 पासून बाजारात आहे. राजधानी दिल्लीमध्ये याची एक्स-शोरुम किंमत 81,556 रुपयांपासून सुरु होते आणि टॉप व्हेरिएंटसाठी 92,000 रुपयांपर्यंत जाते. याचे 124.4cc DTS-i इंजन 11.8 PS पॉवर आणि 10.8 Nm टॉर्क प्रदान करते. मायलेज 50 ते 57 kmpl पर्यंत आहे. जे सरासरी चांगले आहे.
advertisement
पल्सरमध्ये आक्रमक डिझाइन आहे, ज्यामध्ये वुल्फ-आय हेडलॅम्प, डिजिटल-सेमी-अॅनालॉग क्लस्टर आणि 15-लिटर फ्यूल टँक आहे. ती 5-स्पीड गिअरबॉक्ससह येते आणि त्याचे वजन 140 kg आहे. फ्रंट डिस्क ब्रेक, ट्यूबलेस टायर्स आणि नायट्रॉक्स सस्पेंशन या फीचर्सचा समावेश आहे. मजबूत बिल्ड क्वालिटी, चांगली रिसेल व्हॅल्यू आणि आरामदायी रायडिंग पोझिशन ही एक उत्तम निवड आहे.
advertisement
Hero Xtreme 125R
Hero Xtreme 125R नुकतीच लॉन्च झाली आहे आणि ती 125cc सेगमेंटमध्ये प्रीमियम ऑप्शन आहे. दिल्लीमध्ये तिची एक्स-शोरुम किंमत 89,300 रुपयांपासून सुरु होऊन 1.04 लाख रुपयांपर्यंत जाते. याचे 24.7cc इंजिन 11.4 bhp पॉवर आणि 10.5 Nm टॉर्क देते. मायलेज 57 ते 66 kmpl च्या आसपास आहे.
advertisement
Xtreme ची डिझाइन मस्कुलर आहे. ज्यामध्ये एलईडी लायटिंग, डिजिटल क्लस्टर आणि एबीएस (टॉप व्हेरिएंटमध्ये) सामिल आहे. ही 5-स्पीड गियरबॉक्ससह येते आणि वजन 136 kg आहे. फीचर्समध्ये वाइड टायर्स, स्प्लिट सीट आणि हिरो कनेक्ट अॅप आहे. चांगले ब्रेकिंग, प्रीमियम लूक आणि चांगल्या हँडलिंगने ही खास बनते. ही बाईक सेफ्टी आणि स्टाइलवर फोक्स करणाऱ्यांसाठी बेस्ट आहे.
आमची शिफारस: टीव्हीएस रेडर किमतीच्या बाबतीत सर्वात परवडणारी आहे, तर हिरो थोडी महाग आहे पण सुरक्षित आहे. पल्सर परफॉर्मेंसमध्ये आघाडीवर आहे, तर रेडर मायलेजमध्ये जास्त गुण मिळवते. तुम्ही बजेट आणि मायलेज शोधत असाल तर रेडर निवडा. विश्वासार्हतेसाठी, पल्सर आणि प्रीमियम फीचर्ससाठी, एक्सट्रीम हे सर्वोत्तम ऑप्शन आहेत. एकंदरीत, या तीन बाइक्स 125cc सेगमेंटमध्ये उत्कृष्ट पर्याय आहेत. तुम्ही तुमच्या बजेट आणि गरजांनुसार या 125 सीसी बाइक्सपैकी कोणतीही निवडू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 12:18 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त 125CC मोटरसायकल! किंमत फक्त 82000 रुपयांपासून सुरू








