Weather Alert: कल्याण-डोंबिवलीच्या हवामानात मोठे बदल, बदलापूरला काय स्थिती? 18 डिसेंबरचं हवामान अपडेट
- Reported by:
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, शहापूर, बदलापूर परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
ऐन हिवाळ्यात देखील राज्याच्या हवामानात चढ-उतार सुरूच आहेत. गेल्या काही दिवसांत थंडीची लाट ओसरली असून हवामान काहीसं स्थीर आहे. पण आता पुन्हा एकदा तापमानात घसरण होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्याचे तापमान पुन्हा 20 अशांच्यां खाली येण्याची शक्यता आहे. कल्याण-डोंबिवलीसह शहापूर, बदलापूर परिसरातील 18 डिसेंबरचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कल्याण डोंबिवली शहरातील तापमानाचा तुलनेत आज बदलापूर भागात पारा घसरला आहे. किमान तापमान 12 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. मुरबाड, शहापूर शहरात देखील गारठा कायम असून किमान तापमान 14 ते 17 अंशांदरम्यान तर कमाल तापमान 28 ते 30 अंशादरम्यान राहील. हवामान थंड आणि कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.







