advertisement

वाशिम-जालना प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले आदेश, प्रवास करण्यापूर्वीच वाचा

Last Updated:

पुलगाव-जालना महामार्गावरील वाहतूक ८ मार्चपर्यंत बंद राहील. जऊळका रेल्वे फाटक परिसरातील दुरुस्तीमुळे हा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी पर्यायी मार्गांचे आदेश दिले आहेत.

News18
News18
वाशिम प्रतिनिधी किशोर गोमाशे : जिल्ह्यातून जाणाऱ्या पुलगाव-जालना या महत्त्वाच्या महामार्गावरील वाहतूक पुढील दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जऊळका रेल्वे फाटक परिसरातील रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे तातडीचे काम हाती घेण्यात आल्याने हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे कोणतीही घाई गडबड न करता आधीच रस्ता पाहून बाहेर पडा. मार्गात बदल झाल्यामुळे विकेण्डला वाहतूक कोंडी जास्त होण्याचा धोका आहे.
वाहतूक कधी बंद राहणार?
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री १० वाजेपासून ते ८ मार्च रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत हा महामार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील. या कालावधीत रेल्वे फाटकावर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर केले जाणार आहे.
पर्यायी मार्ग कोणते?
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून पर्यायी मार्गांचे आदेश दिले आहेत. मालेगावकडून जाणारी वाहने ही वाहने वाशिम - मंगरूळपीर - कारंजा या मार्गाने पुढे जातील. कारंजा बायपासने शेलू बाजारकडे जाणारी वाहने ही वाहतूक आता समृद्धी महामार्गावरून वळवण्यात आली आहे.
advertisement
मंगरूळपीरकडून शेलू बाजारमार्गे मालेगावकडे जाणारी वाहने या वाहनांना देखील समृद्धी महामार्गाचा वापर करावा लागणार आहे. रेल्वेच्या कामामुळे होणारी ही गैरसोय टाळण्यासाठी वाहनचालकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि प्रवासाला निघण्यापूर्वी वरील पर्यायी मार्गांची नीट माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वाशिम-जालना प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले आदेश, प्रवास करण्यापूर्वीच वाचा
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement