Amavasya 2025: खरी अमावस्या नेमकी कधी, 19 का 20 डिसेंबरला? पाहा अचूक तिथी, पूजा-विधींचे मुहूर्त, पितृशांती
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Amavasya 2025 Date: मार्गशीर्ष कृष्ण अमावस्या तिथीला या वर्षाची अंतिम अमावस्या येत आहे. वर्षाची ही शेवटची अमावस्या 19 डिसेंबरला आहे की 20 डिसेंबरला, असा प्रश्न अनेकांना पडलाय, कारण अमावस्येची तिथी दोन्ही दिवशी आहे. मार्गशीर्ष अमावस्येच्या योग्य तारखेबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे.
मुंबई : शुभ कामांसाठी खास मानला जाणारा मार्गशीर्ष महिना संपत आला असून मार्गशीर्ष कृष्ण अमावस्या तिथीला या वर्षाची अंतिम अमावस्या येत आहे. वर्षाची ही शेवटची अमावस्या 19 डिसेंबरला आहे की 20 डिसेंबरला, असा प्रश्न अनेकांना पडलाय, कारण अमावस्येची तिथी दोन्ही दिवशी आहे. मार्गशीर्ष अमावस्येच्या योग्य तारखेबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी आपल्याला पंचांगाची मदत घ्यावी लागेल. जाणून घेऊया मार्गशीर्ष अमावस्येची योग्य तारीख, स्नान-दान मुहूर्त आणि श्राद्धाची वेळ..
मार्गशीर्ष अमावस्येची योग्य तिथी -
दृक पंचांगानुसार, मार्गशीर्ष अमावस्येची तिथी 19 डिसेंबरला पहाटे 4 वाजून 59 मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती 20 डिसेंबरला सकाळी 7 वाजून 12 मिनिटांपर्यंत राहील. 20 डिसेंबरला मार्गशीर्ष अमावस्या तिथी सूर्योदयानंतर म्हणजेच सकाळी 7 वाजून 9 मिनिटांनंतर फक्त 3 मिनिटांसाठी प्राप्त होत आहे. उदयातिथीमध्ये मार्गशीर्ष अमावस्या केवळ 3 मिनिटांसाठी मिळत असल्याने, या दिवशी कोणीच अमावस्येच्या विधी करू शकणार नाही.
advertisement
19 डिसेंबरला मार्गशीर्ष अमावस्येची तिथी सूर्योदय (सकाळी 7 वाजून 9 मिनिटे) पासून संपूर्ण दिवसभर राहील. त्यामुळे 19 डिसेंबरला दिवसभर मार्गशीर्ष अमावस्या तिथी असल्याने लोकांना अमावस्येचं स्नान, दान, तर्पण आणि श्राद्ध इत्यादी करू शकतील. त्यामुळे मार्गशीर्ष अमावस्या 19 डिसेंबरला साजरी करणं उत्तम राहील.
मार्गशीर्ष अमावस्येचा मुहूर्त - मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी ज्या लोकांना स्नान आणि दान करायचं आहे, त्यांच्यासाठी ब्रह्म मुहूर्त सकाळी 5 वाजून 19 मिनिटांपासून ते 6 वाजून 14 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेत स्नानानंतर दान करू शकता. तसंच, ब्रह्म मुहूर्तानंतर सकाळी 7 वाजून 9 मिनिटांपासून ते सकाळी 11 वाजून 1 मिनिटांपर्यंत स्नान आणि दानासाठी चांगला काळ आहे.
advertisement
मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवसाचे शुभ चौघडिया मुहूर्त:
चर-सामान्य मुहूर्त: सकाळी 7 वाजून 9 मिनिटांपासून ते 8 वाजून 26 मिनिटांपर्यंत.
लाभ-उन्नती मुहूर्त: सकाळी 8 वाजून 26 मिनिटांपासून ते 9 वाजून 43 मिनिटांपर्यंत.
अमृत-सर्वोत्तम मुहूर्त: सकाळी 9 वाजून 43 मिनिटांपासून ते 11 वाजून 1 मिनिटांपर्यंत.
advertisement
मार्गशीर्ष अमावस्येचा शुभ काळ -
मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवसाचा शुभ काळ म्हणजे अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 58 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 39 मिनिटांपर्यंत आहे. तर, विजय मुहूर्त दुपारी 2 वाजून 2 मिनिटांपासून ते दुपारी 2 वाजून 43 मिनिटांपर्यंत राहील. अमृत काल दुपारी 1 वाजून 3 मिनिटांपासून ते 2 वाजून 50 मिनिटांपर्यंत आहे.
advertisement
मार्गशीर्ष अमावस्येला श्राद्ध -
मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी लोक स्नानानंतर आपल्या पितरांचं स्मरण करतात आणि त्यांच्या नावाने दान करतात. दानामध्ये तुम्ही धान्य, पांढरे वस्त्र, फळं इत्यादी देऊ शकता. अमावस्येच्या दिवशी पितर पितृलोकातून पृथ्वीवर येतात, त्यामुळे त्यांना तृप्त करण्यासाठी श्राद्ध, पिंडदान, तर्पण इत्यादी केलं जातं. ज्या लोकांना मार्गशीर्ष अमावस्येवर पितरांसाठी श्राद्ध कर्म करायचं आहे, ते दिवसा 11 वाजून 30 मिनिटांपासून ते दुपारी 2 वाजून 30 मिनिटांच्या दरम्यान करू शकतात.
advertisement
पितरांसाठी दिवा लावा - पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी वर्षाच्या या अंतिम अमावस्येला तुम्ही पंचबलि कर्म करू शकता. अमावस्येच्या संध्याकाळच्या वेळी घराबाहेर दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावावा. यामुळे पितरांच्या मार्गात अंधार राहत नाही. संध्याकाळी जेव्हा पितर परत जातात, तेव्हा मार्गात प्रकाश पाहून ते प्रसन्न होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 7:36 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Amavasya 2025: खरी अमावस्या नेमकी कधी, 19 का 20 डिसेंबरला? पाहा अचूक तिथी, पूजा-विधींचे मुहूर्त, पितृशांती








