मुंबईत या ठिकाणी होणार दुसरा आयफेल टॉवर; सरकारकडून घोषणा

Last Updated:

Thane Tourism Project : ठाणे शहराच्या विकासासाठी कासारवडवली येथे देशातील सर्वात उंच निरीक्षण मनोरा आणि कन्व्हेन्शन सेंटर तर कोलशेत येथे टाऊन पार्क, स्नो पार्क आणि अ‍ॅडव्हेंचर पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Second Eiffel Tower Mumbai
Second Eiffel Tower Mumbai
ठाणे : गेल्या काही वर्षात ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या हिताचे प्रकल्प सुरु झाले आहे. ज्यामुळे नागरिकांना फायदा होत असून शहराचाही विकास त्यासोबत होत आहे. त्यातच सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेते अजून एका मोठ्या विकास प्रकल्पाची घोषणा केली आहे.
काय सांगता! मुंबईत होणार दुसरा आयफेल टॉवर
ज्यात घोषणा केलेल्या प्रकल्पामुळे ठाणे शहराचा चेहरामोहरा बदलणार असून ते प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओखळ मिळून देतील.ठाणे शहरातील कासारवडवली येथील खाडीकिनारी निरीक्षण मनोरा म्हणेज 'Viewing Tower'आणि भव्य कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार असून हा प्रकल्प ठाण्याच्या पर्यटन विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
कासारवडवली खाडीकिनारी सुमारे 50 एकर जागेत 'मंगल कलश' या संकल्पनेवर आधारित 260 मीटर उंचीचा देशातील सर्वात उंच टॉवर उभारण्यात येणार आहे. आयफेल टॉवरच्या धर्तीवर साकारण्यात येणाऱ्या या टॉवरमध्ये अत्याधुनिक निरीक्षण मनोरा तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर असणार आहे. यातील विशेष बाब म्हणजे आयफेल टॉवरची उंची 300 मीटर असून हा टॉवर देशातील अतिशय उंच इमारतींपैकी एक असणार आहे. या प्रकल्पाचे संपूर्ण डिझाईन हफीज कॉन्ट्रॅक्टर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले आहे.
advertisement
एवढेच नाही तर कोलशेत परिसरात 25 एकर जागेवर बीओटी तत्त्वावर टाऊन पार्क उभारले जाणार आहे. या टाऊन पार्कमध्ये आगरी-कोळी संस्कृती दर्शवणारे संग्रहालय, आधुनिक विज्ञान केंद्र, भव्य मत्स्यालय, क्रीडासंकुल, स्नो पार्क, अ‍ॅमेझॉन पार्क, अ‍ॅडव्हेंचर पार्क आणि पक्षी संग्रहालय यांचा समावेश असेल. विशेष गोष्ट म्हणजे येथे तळमजला आणि एक मजला अशा स्वरूपातील एलिव्हेटेड गार्डन विकसित करण्यात येणार असून नागरिकांना पर्यटनाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
मुंबईत या ठिकाणी होणार दुसरा आयफेल टॉवर; सरकारकडून घोषणा
Next Article
advertisement
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला
  • ज्याच्यावरून धुरंधर साकारला गेला तो चौधरी असलम कोण होता?

  • सिगारेट, पिस्तूल आणि ‘हवा-हवा’ – धुरंधरमागची खरी कहाणी थरकाप उडवणारी

  • एक माणूस, एक शहर आणि अखेरचा स्फोट – धुरंधरमागची खरी स्टोरी

View All
advertisement