Weather Update : मुंबई-पुणे हवामानात मोठे बदल, पुढील 24 तासांसाठी हवामान खात्याकडून नवा अलर्ट जारी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला असून त्यामुळे किमान तापमान स्थिरावले आहे. सकाळी गारवा जाणवेल, पण तो फार तीव्र नसेल, तर दुपारच्या वेळेत तापमान उबदार राहणार आहे.
15 डिसेंबर रोजी राज्यातील हवामानात गेल्या आठवड्यातील तुलनेत स्पष्ट बदल जाणवणार आहे. काही दिवसांपूर्वी सकाळी आणि रात्री जी थंडी अधिक जाणवत होती, ती आता बर्‍याच भागांत कमी झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला असून त्यामुळे किमान तापमान स्थिरावले आहे. सकाळी गारवा जाणवेल, पण तो फार तीव्र नसेल, तर दुपारच्या वेळेत तापमान उबदार राहणार आहे. एकूणच आजचा दिवस थंडीपेक्षा आरामदायक हवामानाचा राहील.
advertisement
मुंबई आणि परिसरात आज सकाळी तापमान साधारण 19 ते 20 अंशांच्या आसपास राहणार असून गारवा जाणवेल, पण मागील दिवसांसारखी थंडी जाणवणार नाही. दुपारच्या वेळेत तापमान 30–31 अंशांपर्यंत जाणार असल्याने ऊन चांगलं तापेल आणि हवेत उब वाढलेली जाणवेल. संध्याकाळनंतर पुन्हा थोडा गारवा जाणवेल, मात्र जाड कपड्यांची गरज भासेल इतकी थंडी नाही. मुंबईकरांसाठी आज हवामान एकंदरीत आरामदायक राहणार आहे.
advertisement
पुण्यात थंडीचा जोर आता कमी झालेला दिसतो आहे. सकाळच्या वेळेत तापमान साधारण 12–13 अंशांच्या आसपास राहील, त्यामुळे थोडी थंडी जाणवेल, पण मागील आठवड्यासारखा कडाक्याचा गारठा नाही. दुपारच्या वेळेत तापमान 29 ते 30 अंशांपर्यंत वाढेल आणि हवामान उबदार वाटेल. त्यामुळे सकाळी बाहेर पडताना हलकी काळजी घ्यावी लागेल, पण दिवसभर थंडीचा त्रास होणार नाही. पुढील दोन दिवस पुण्यात हेच मिश्र स्वरूपाचं हवामान राहणार आहे.
advertisement
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही आज हवामान कोरडे राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात सकाळचे तापमान 11–14 अंशांच्या आसपास राहील, त्यामुळे इथे थंडी तुलनेने अधिक जाणवेल, पण ती तीव्र नाही. मराठवाड्यात किमान तापमान 12 –15 अंश, तर विदर्भात 14-16 अंशांच्या आसपास राहणार आहे. या भागांत दिवसा तापमान चांगलंच वाढणार असल्याने थंडीपेक्षा उबदारपणा जास्त जाणवेल.
advertisement











