advertisement

ठरलं! 'बिग बॉस मराठी 6' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, रितेश भाऊ घेऊन येतोय महाराष्ट्राचं तुफान

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी 6'चा नवा प्रोमो आऊट झाला आहे. रितेश भाऊचा मराठमोठा दमदार स्वॅग चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
1/7
 "स्वागताला दारं उघडी ठेवा! मी येतोय,” म्हणत रितेश देशमुख घेऊन येत आहे बिग बॉस मराठी सीझन 6.
"स्वागताला दारं उघडी ठेवा! मी येतोय,” म्हणत रितेश देशमुख घेऊन येत आहे बिग बॉस मराठी सीझन 6.
advertisement
2/7
 'बिग बॉस मराठी 6'चा नवा प्रोमो आऊट झाला आहे. या नव्या प्रोमोमुळे महाराष्ट्रात एकच चर्चा, एकच विषय घोळतोय बिग बॉस मराठी सिझन 6.

3/7
 सगळीकडे उत्साहाची लाट उसळली आहे. रितेश भाऊंचा मस्त लूक, दमदार स्वॅग प्रेक्षकांची मने जिंकत आहे. “मागचा सीझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय...आहात ना तय्यार!” भाऊच्या या वाक्याने प्रेक्षकांची धडधड अजूनच वाढली आहे.

4/7
 नव्या सीझनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मागील सिझनने जबरदस्त धुमशान घातलं आणि यंदाच्या सिझनमध्ये Swag तोच असणार आहे, पण पॅटर्न रितेश भाऊंचा असणार आहे. काय पॅटर्न असणार? कसा लूक असणार? सदस्य कोण असणार? सगळं अजून गुलदस्त्यात आहे.

5/7
 'बिग बॉस मराठी सिझन 6' 11 जानेवारीपासून दररोज रात्री 8 वा. कलर्स मराठी आणि JioHotstar वर प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

6/7
 भाऊच्या एन्ट्रीसाठी उभारलेला आलिशान सेट, भव्य मिरवणुकीचे वातावरण, ढोल–ताशांचा गजर, रंगीबेरंगी रोषणाई आणि तब्बल 250 ते 300 लोकांची दणदणीत उपस्थिती या सगळ्यांच्या साक्षीने पार पडला 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सिझनचा लार्जर-दॅन-लाईफ प्रोमो.

7/7
 रितेश भाऊने पहिल्यांदाच प्रोमोमध्ये पारंपरिक वेशभूषा केली आहे. प्रत्येक फ्रेममध्ये त्याचा दिसणारा स्वॅग प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या नव्या प्रोमोने बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनचा बिगुल वाजला आहे. दरम्यान, सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे आणि चर्चेत आहेत प्रोमोमधले रितेश भाऊंचे कडक डायलॉग... घरात कुणाचा नवस पूरा होणार? तर कुणाच्या सलामीने वातावरण झिंगणार? “काही असे हि असणार… पण, मी गप्प नाही बसणार...! अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत लवकरच!

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement