John Cena retirement : रिटायर्ड झाला, रिंग शांत झाली! पण जॉन सीनाची 'ती' मॅच कधीच विसरू शकत नाही, पाहा Video

Last Updated:

John Cena Most Famous match : जॉन सीनाचा एक सामना आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. ही मॅच होती, जॉन सीना आणि द रॉक यांच्यातील वन्स इन लाईफटाईम मॅच...

John Cena Most Famous match
John Cena Most Famous match
WWE सुपरस्टार जॉन सीना आता त्याच्या कारकिर्दीच्या शेवटावर आहे. शनिवारी जॉन सीनाने आपल्या करियरची अखेरची मॅच खेळली. जॉन सीनाच्या अंतिम लढतीबद्दल संपूर्ण WWE जग भावूक झालं आहे. अखेरच्या लढतीत जॉन सीनाने गुंथरविरुद्धचा अंतिम सामना गमावला. 'द रिंग जनरल' गुंथरने सीनाला बाहेर पडण्यास भाग पाडलं. मॅच संपल्यावर जॉन सीना भावूक झाला. आता तो रिंगमध्ये दिसणार नाही. अशातच दुसरीकडे जॉन सीनाचा एक सामना आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. ही मॅच होती, जॉन सीना आणि द रॉक यांच्यातील वन्स इन लाईफटाईम मॅच...
जॉन सीना आणि द रॉक यांच्या वन्स इन लाईफटाईम या मॅचच्या सुमारे एक वर्ष आधीच, रॉक हा रेसलमेनिया 27 चा Host म्हणून परतला आणि त्याने लगेच जॉन सीनासोबत वाद सुरू केला. या दोन वेगवेगळ्या युगातील सुपरस्टारमध्ये मोठ्या प्रमाणात शाब्दिक युद्ध झाले, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड हाईप निर्माण झाली. या मॅचॉला "Once in a Lifetime" असे प्रमोट करण्यात आले, कारण दोघंही WWE मधील सर्वात मोठे स्टार होते, पण त्यांची टाईमिंग आणि शैली पूर्णपणे वेगळी होती. सीना हा WWE चा फुल टाईम फेस होता, तर रॉक हा हॉलिवूडचा सुपरस्टार असून अनेक वर्षांनी पूर्णवेळ मॅचसाठी परतला होता.
advertisement

पाहा तो संपूर्ण सामना

दोन्ही पैलवानांमधील ही मॅच रेसलमेनिया 27 मध्ये मामिया येथे, The Rock च्या होमटाऊनमध्ये झाली होती. या मॅचमध्ये WWE मधील दोन पिढ्यांची लढत पाहायला मिळाली. संपूर्ण मॅचमध्ये फुल ड्रामा आणि चढ उतार होते. मॅचच्या शेवटी, सीनाने रॉकला त्याचीच अखेरचा फटका म्हणजेच "Rock Bottom" मारण्याचा प्रयत्न केला, पण रॉकने त्याला पलटवार करत Rock Bottom दिला आणि मॅच जिंकला. सीनाचा हा पराभव चाहत्यांसाठी धक्कादायक होता आणि या मॅचमुळे WWE च्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि Iconic Main Events पैकी एक निर्माण झाला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
John Cena retirement : रिटायर्ड झाला, रिंग शांत झाली! पण जॉन सीनाची 'ती' मॅच कधीच विसरू शकत नाही, पाहा Video
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement