राज्यात सर्व महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात होणार? निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर

Last Updated:

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

News18
News18
मुंबई: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका आता एकाच टप्प्यात पार पडण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोग १५ डिसेंबरनंतर कधीही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांसाठी एकाच दिवशी मतदान प्रक्रिया पार पडण्याची दाट शक्यता आहे. यासाठी जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडू शकते.
यापूर्वी, नागपूर आणि चंद्रपूर या दोन महानगरपालिकांमध्ये दिलेलं आरक्षण ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून गेले होते. त्यामुळे या दोन महापालिकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत आणल्यानंतरच निवडणूक घोषित केली जाईल, असा तर्क राजकीय वर्तुळात लावला जात होता. यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जातील अशी शक्यता होती.
advertisement
मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा महापालिकांमध्ये निवडणूक घेऊ नका, असे निर्देश न्यायालयाने कुठेही दिलेले नाहीत. त्यामुळे, आरक्षणाच्या मर्यादेचा मुद्दा बाजूला ठेवून, संबंधित महापालिकेत निवडणूक प्रक्रिया पुढे नेली जाऊ शकते, अशी माहिती समजत आहे.

१५ डिसेंबरनंतर कधीही घोषणा

राज्य निवडणूक आयोग १५ डिसेंबरनंतर कोणत्याही क्षणी राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक यांसारख्या मोठ्या महानगर पालिकांचा समावेश आहे. त्यामुळे आता या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज्यात सर्व महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात होणार? निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement