अरे देवा! 2025 तर गेलंच आता 2026 ही संकटात जाणार, या राशींची शनिदेव परीक्षा घेणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Shani SadeSati : ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा कर्म, शिस्त आणि संयमाचा कारक ग्रह मानला जातो. शनी जेव्हा राशी बदलतो, तेव्हा त्याचा प्रभाव केवळ वैयक्तिक जीवनावरच नाही तर करिअर, आर्थिक स्थिती, आरोग्य आणि नातेसंबंधांवरही खोलवर जाणवतो.
ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा कर्म, शिस्त आणि संयमाचा कारक ग्रह मानला जातो. शनी जेव्हा राशी बदलतो, तेव्हा त्याचा प्रभाव केवळ वैयक्तिक जीवनावरच नाही तर करिअर, आर्थिक स्थिती, आरोग्य आणि नातेसंबंधांवरही खोलवर जाणवतो. 2026 मध्ये शनी मीन राशीत भ्रमण करणार असून, या एका बदलामुळे सर्व 12 राशींवर वेगवेगळ्या स्वरूपाचे परिणाम दिसून येतील. साडेसाती, धैय्या तसेच शनीच्या लोह, तांबे, चांदी आणि सुवर्ण या चार चरणांचा प्रभाव यावर्षी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
advertisement
ज्योतिषीय गणनेनुसार, 2026 मध्ये शनी मीन राशीत असल्याने मेष, कुंभ आणि मीन राशींना साडेसातीचा अनुभव येईल, तर सिंह आणि धनु राशींवर धैय्याचा प्रभाव राहील. यासोबतच, चंद्राच्या स्थितीनुसार शनीचे विविध धातूंचे चरण कार्यरत राहतील. शनी जर चंद्रापासून पहिल्या, सहाव्या किंवा अकराव्या स्थानात असेल तर सुवर्ण चरण, दुसऱ्या, पाचव्या किंवा नवव्या स्थानात असेल तर रौप्य चरण, तिसऱ्या, सातव्या किंवा दहाव्या स्थानात असेल तर ताम्र चरण आणि चौथ्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानात असेल तर लोह चरण प्रभावी मानला जातो.
advertisement
लोह चरण - 2026 मध्ये मेष, सिंह आणि धनु राशींवर शनीचा लोह चरण प्रभावी राहण्याची शक्यता आहे. हा चरण सर्वात कठीण मानला जातो. या राशींच्या लोकांना व्यवसायात अडथळे, नोकरीत अस्थिरता आणि आर्थिक ताण जाणवू शकतो. कौटुंबिक मतभेद वाढू शकतात, तसेच उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बिघडू शकतो. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळावा लागेल. मानसिक तणाव, थकवा आणि अपघाताची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
advertisement
सुवर्ण चरण - वृषभ, तूळ आणि मीन राशींवर शनीचा सुवर्ण चरण प्रभाव टाकेल. या काळात जबाबदाऱ्या वाढतील आणि काही कठीण निर्णय घ्यावे लागतील. करिअर आणि कौटुंबिक जीवनात दबाव जाणवू शकतो. खर्च वाढण्याची शक्यता असून बचतीकडे लक्ष देणे आवश्यक ठरेल. नातेसंबंधात गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे संयम आणि संवाद महत्त्वाचा ठरेल. आरोग्याच्या बाबतीत नियमित तपासणी आणि दिनचर्येची शिस्त पाळणे फायदेशीर ठरेल.
advertisement
ताम्र चरण - मिथुन, कन्या आणि मकर राशींना 2026 मध्ये शनीचा ताम्र चरण लाभदायक ठरेल. या राशींसाठी हे वर्ष करिअरमध्ये प्रगतीचे संकेत देणारे आहे. नोकरीत पदोन्नती, व्यवसायात विस्तार आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि संशोधनात यश मिळू शकते. कुटुंबातील आनंददायी घटना, प्रवास आणि सुखसोयींमध्ये वाढ होण्याचे योग आहेत.
advertisement
रौप्य चरण - कर्क, वृश्चिक आणि कुंभ राशींवर शनीचा रौप्य चरण प्रभावी राहील. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. या राशींच्या लोकांना मागील कष्टांचे फळ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत स्थैर्य, अचानक आर्थिक लाभ, जमीन किंवा वाहन खरेदीचे योग दिसून येतात. अविवाहितांसाठी विवाहाचे मार्ग खुले होतील, तर संततीची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळू शकते. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि मनःशांती लाभेल.
advertisement










