Mumbai Traffic : मुंबईकरांनो लक्ष द्या! मेस्सीच्या कार्यक्रमामुळे शहरात वाहतुकीत मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Last Updated:

Lionel Messi GOAT India Tour Mumbai Visit : लिओनेल मेस्सी आज मुंबईत दाखल होत असून त्याच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

Lionel Messi GOAT India Tour Mumbai Visit
Lionel Messi GOAT India Tour Mumbai Visit
मुंबई : सध्या प्रत्येक तरुणाईच्या चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे जगप्रसिद्ध फुटबॉलपटू आणि अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी. सध्या हा खेळाडू GOAT इंडिया टूर 2025 अंतर्गत भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तो कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली या प्रमुख शहरांना भेट देणार आहे. शनिवारी मेस्सीने कोलकात्यात हजेरी लावली असून आज रविवारी (ता.14) तो मुंबईत येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी महत्त्वाची वाहतूकविषयक माहिती समोर आली आहे.
लिओनेल मेस्सी तब्बल 14 वर्षांपूर्वी म्हणजे 2011 ला भारतात आला होता. पण तो पुन्हा भारत दौऱ्यावर आला असून त्याच्या उपस्थितीमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. आज मुंबईतील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष सुरक्षा आणि वाहतूक नियोजन जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि प्रवाशांनी आधीच प्रवासाचे योग्य नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
मेस्सीच्या कार्यक्रमामुळे वाहतुकीत मोठा बदल
वानखेडे स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियम येथे होणाऱ्या कार्यक्रमामुळे संध्याकाळी 5 वाजल्यानंतर दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या कारणास्तव काही रस्त्यांवर तात्पुरते वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सी, डी, ई, एफ, जी रोड, वीर नरिमन रोड, दिनशा वाच्छा रोड, जमशेदजी टाटा रोड आणि एन.एस. रोडवर वाहतूक नियंत्रण राहणार आहे तसेच डी रोड (पश्चिम-पूर्व), ई रोड (दक्षिण दिशेने) आणि वीर नरिमन रोडवर एकतर्फी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.
advertisement
कोस्टल रोड (मरीन ड्राइव्ह–वरळी/तारदेव) तसेच चंद्र बोस रोडवर तात्पुरती बंदी घालण्यात आली असून महत्त्वाच्या चौकांवर पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने स्टेडियम परिसरात पार्किंगला परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र चर्चगेट, एच.टी. पारेख मार्ग, दोराबजी टाटा रोड, जमनालाल बजाज मार्ग आणि विधान भवन परिसरात 'पे अँड पार्क' सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, जागा मर्यादित असणार आहे.
advertisement
किती काळासाठी हा बदल असणार?
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा सल्ला दिला असून ही वाहतूक व्यवस्था दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Traffic : मुंबईकरांनो लक्ष द्या! मेस्सीच्या कार्यक्रमामुळे शहरात वाहतुकीत मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement