Numerology: बर्थडेट 3, 12, 21, 30 असणाऱ्यांनी मोठा निर्णय चुकवू नका; तुम्हाला 'या' जन्मतारखांचे पार्टनरच बेस्ट
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology 3 Compatibility: आयुष्याचा जोडीदार निवडताना काहीजण फार विचार करतात तर काहीजण पटकन निर्णय घेऊन टाकतात. पार्टनरची निवड करताना तुम्हाला अंकशास्त्र मदत करेल. लग्न आणि आयुष्याचा जोडीदार निवडणं आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं असतं. योग्य साथीदार मिळाला तर आयुष्य खूप चांगलं, आनंदी होतच. शिवाय आपली स्वतःची प्रगती आणि मानसिक संतुलनही चांगलं राहतं. आज आपण मूलांक किंवा भाग्यांक 3 विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. या मूलांकासाठी बेस्ट पार्टनर कोणत्या जन्मतारखांचा आहे, जाणून घेऊ.
जर तुमचा भाग्यांक 3 असेल तर तुम्ही स्वभावाने खूप मनमिळाऊ, क्रिएटिव्ह आणि आयुष्यात उत्साही असता. भाग्यांक 3 चे लोक गुरू ग्रहाच्या प्रभावाखाली असतात. एकंदरीत मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा स्वभाव खूप हसतमुख आणि मजेशीर असतो. यांना असा जोडीदार हवा असतो, जो त्यांच्या क्रिएटिव्हिटीचा आदर करेल, त्यांच्या कल्पनांना महत्त्व देईल आणि त्यांच्या उत्साहात साथ देईल. शिवाय, मूलांक 3 चे लोक फास्ट आणि ॲक्टिव्ह जीवनशैलीशी जुळवून घेणाऱ्या जोडीदाराच्या शोधात असतात. योग्य जोडीदार निवडल्यास त्यांचं वैवाहिक आयुष्य एकदम आनंदी, बॅलन्स्ड आणि खूप काळ मजबूत राहतं. मूलांक 3 म्हणजे (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झाला आहे) पाहुया भाग्यांक 3 साठी कोणते मूलांक चांगले आहेत आणि कोणापासून दूर राहायला हवं.
advertisement
मूलांक 3 च्या लोकांना अशा जोडीदाराची गरज असते जो सर्जनशील असेल आणि त्यांच्या कलात्मक बाजूला समजून घेईल. सकारात्मक विचार आणि आशावादी असलेले जोडीदार त्यांच्यासाठी नेहमी योग्य असतात. वेगळं स्वीकारणारे म्हणजे कम्फर्ट झोन सोडून नवीन गोष्टी करून बघायला तयार असतात, ते त्यांना आवडतात. विनोदी स्वभावाचे आणि जीवनात आनंदाच्या शोधात असलेले जोडीदार त्यांच्या जीवनात संतुलन आणतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
भाग्यांक 3 चा भाग्यांक 8 आणि 9 सोबतचा संबंधभाग्यांक 3 आणि 8 ची जोडी जमू शकते, नात्यात महत्त्वाकांक्षी असतात. भाग्यांक 8 चे जोडीदार भाग्यांक 3 ला त्यांची ध्येये साध्य करण्यास मदत करतात. तर भाग्यांक 3 आणि 9 ची जोडी समाजात आदर्शही ठरू शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)








