या महिन्यात लॉन्च होणार या दणकट कार! SUV, EV लिस्टमध्ये सर्वांचाच समावेश
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुम्हाला नवी कार घ्यायची असेल तर थोडं तांबा. कारण एप्रिल 2026 मध्ये भारी कार लॉन्च होणार आहेत. यामध्ये टोयोटा, मारुती सारख्या मोठ्या कंपन्यांच्या वाहनांचाही समावेश आहे. एसयूव्हीपासून लग्जरी ईव्हीपर्यंत, मार्केटमध्ये या महिन्यात जबरदस्त ऑप्शन मिळणार आहेत.
Upcoming Car in April 2026: या वर्षात अनेकजण हे नवी कार घेण्याचा विचार करत आहेत. तुम्हीही करत असाल तर तर एप्रिल 2026 तुमच्यासाठी खास ठरू शकतो. या महिन्यात ऑटो सेक्टरमध्ये एकानंतर एक अनेक मोठे लॉन्च पाहायला मिळू शकतात. SUV, इलेक्ट्रिक कार आणि नवीन व्हेरिएंट्स प्रत्येक सेगमेंटमध्ये काही तरी नवं येणार आहे. अशावेळी कार खरेदी करण्यापूर्वी जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, या महिन्यात कोणकोणत्या कार बाजारात एंट्री करणार आहेत.
Volkswagen Taigun Facelift
Volkswagen आपल्या Taigun चा फेसलिफ्ट व्हर्जन 9 एप्रिल रोजी सादर करू शकते. डिझाइनमध्ये मोठे बदल होणार नाही. मात्र थोडा-फार अपडेटमुळे कारला फ्रेश लूक मिळेल. आतील बाजूला इंफोटेनमेंट आणि कम्फर्ट फीचर्समध्ये सुधारणा पाहायला मिळू शकतात. इंजिन ऑप्शन पहिल्यासारखेच राहतील. ज्यात 1.0 आणि 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनचा समावेश आहे.
advertisement
Mercedes-Benz CLA Electric
Mercedes-Benz आपल्या नव्या इलेक्ट्रिक सेडान CLA ला भारतात लॉन्च करण्याची तयारी करतेय. याची सर्वात मोठी खासियत म्हणजे 750 किमीपर्यंत रेंज असल्याचं बोललं जातंय. यात 85.5 kWh बॅटरी आणि 272 PS ची मोडर मिळेल. सोबतच यात लेटेस्ट MB.OS इंफोटेनमेंट सिस्टम आणि प्रीमियम इंटीरियरही उपलब्ध असेल.
advertisement
MG Hector Diesel
MG Hector ही लवकरच डिझेल इंजिनसह सादर केली जाऊ शकते. नुकतंच याचं फेसलिफ्ट व्हर्जन आलंहोतं आणि आता यात 2-लिटर डिझेल इंजिन (170 PS/350 Nm) मिळण्याची अपेक्षा आहे. जे 6-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्ससह येईल. फीचर्सविषयी बोलायचं झाल्यास, यात 14-इंच टचस्क्रीन, पॅनोरमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स आणि ADAS सारखे फीचर्स पहिल्यापासूनच उपलब्ध आहेत.
advertisement
MG Majestor
MG Majestor ही पहिलेच भारतात सादर करण्यात आली आहे. आता याची विक्री एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. ही एक प्रीमियम एसयूव्ही असेल. ज्याची विक्री एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. ही एक प्रीमियम एसयूव्ही असेल. ज्यात 12.3-इंच टचस्क्रीन, 12-वे पॉवर सीट्स, मसाज फंक्शन, पॅनोरमिक सनरूफ आणि 3-जोन क्लायमेट कंट्रोल सारखे फीचर्स मिळतील. यात 2-लिटर डिझेल इंजन (215 PS/478 Nm)दिलं जाईल.
advertisement
Maruti Brezza Facelift
Maruti Suzuki Brezza चा फेसलिफ्ट व्हर्जनही एप्रिलच्या अखेरीस लॉन्च होऊ शकतो. याद डिझाइनमध्ये थोडे बदल आणि काही नवे फीचर्स जोडले जाऊ शकतात. सध्याच्या मॉडलमध्ये पहिल्यापासून 9-इंच टचस्क्रीन, वायरलेस Android Auto/Apple CarPlay, क्रूझ कंट्रोल आणि 6 एयरबॅग सारखे फीचर्स मिळतात.
advertisement
Toyota Ebella EV
ही एप्रिलच्या मध्यात लॉन्च केली जाऊ शकते. यात 49 kWh आणि 61 kWh बॅटरी ऑप्शन मिळतील. जे जवळपास 543 किमीपर्यंत रेंज देऊ शकतात. यात 10.1-इंच टचस्क्रीन, डिजिटल डिस्प्ले आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसारखे फीचर्स मिळतील. विशेष म्हणजे याची बॅटरी रेंटल मॉडल आहे. ज्यामुळे सुरूवातीला किंमत कमी होऊ शकते.
advertisement
Nissan Gravite CNG
Nissan आपली Gravite MPV च्या सीएनची व्हेरिएंटच्या किंमतीची घोषणा एप्रिलच्या अखेरीपर्यंत करू शकते. ही कार 1-लिटर पेट्रोल इंजिन (72 PS)सह येईल. यात फॅक्ट्री फिटेड सीएनजी किट असेल. फीचर्समध्ये 8-इंच टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि 6 एयरबॅगसारखे सेफ्टी फीचर्स मिळतील.
एकूणच एप्रिल 2026 हे वर्ष कार लॉन्चच्या हिशोबाने खुपच व्यस्त राहणारा महिना आहे. तुम्ही बजेट कार शोध असाल किंवा मग लग्जरी ईव्ही, प्रत्येक सेगमेंट कारचे ऑप्शन तुम्हाला या महिन्यात मिळणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 2:15 PM IST










