advertisement

KKR vs SRH: अभिषेक शर्मा की नरेन, कुणाची चालणार जादू, कोण ठरणार वरचढ?

Last Updated:

ईडन गार्डन्सवर आज KKR विरुद्ध SRH सहावा IPL सामना, दोन्ही संघ पहिल्या पराभवानंतर पहिल्या विजयाच्या शोधात, हेड टू हेडमध्ये KKR २० तर हैदराबाद १० विजय.

फोटो सौजन्य-  सोशल मीडिया
फोटो सौजन्य- सोशल मीडिया
IPL च्या सीझनला सुरुवात झाली आहे. 2026 च्या या सीझनमध्ये सहावा सामना आज होणार आहे. KKR विरुद्ध SRH आज सामना होणार आहे. पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. केकेआरला मुंबई इंडियन्सकडून, तर सनरायझर्सला आरसीबीकडून ६ गडी राखून पराभूत व्हावे लागले. त्यामुळे आजच्या सामन्यात विजयाचे खाते उघडण्यासाठी दोन्ही संघ जीवाची बाजी लावताना दिसतील.
हेड टू हेड आकडेवारी काय सांगते?
आतापर्यंत झालेले सामने पाहिले तर कोलकाता नाईट रायडर्सचा दबदबा प्रत्येक सीझनमध्ये सुरुवातीला राहिलेला पाहायला मिळतो. आतापर्यंत या दोन संघांमध्ये ३० सामने झाले असून, त्यापैकी २० वेळा केकेआरने बाजी मारली आहे, तर हैदराबादला केवळ १० सामन्यांत विजय मिळवता आला आहे. ईडन गार्डन्सवर केकेआरला हरवणं हे कोणत्याही संघासाठी नेहमीच मोठं आव्हान राहिलं आहे.
advertisement
ईडनचं मैदान KKR चं नशीब पालटणार
ईडनचं मैदान हे वानखेडेसारखंच फलंदाजांसाठी एकदम परफेक्ट आहे असं मानलं जातं. मात्र, संध्याकाळच्या वेळी दव पडलं तर मात्र परिस्थिती बदलते. त्यामुळे टॉस जिंकणारी टीम कायम पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेते. त्यामुळे नंतर स्कोअर चेक करायला मदत होते. आता KKR टॉस जिंकण्यात यशस्वी होणार की त्यांनाच पहिल्यांदा बॅटिंग करण्याची वेळ येणार ते आज संध्याकाळी 7 वाजता समजणार आहे.
advertisement
KKR चे हुकमी एक्के
पहिल्या सामन्यात मुंबईविरुद्ध पराभव झाला असला तरी केकेआरने २२० धावांचा डोंगर उभा केला होता. कर्णधार अजिंक्य रहाणे ६७ धावा आणि फिन ॲलन ही जोडी फॉर्मात आहे. उपकर्णधार रिंकू सिंग शेवटच्या षटकांमध्ये पुन्हा एकदा आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज आहे. तसेच, ईडनच्या खेळपट्टीवर सुनील नरेन आपल्या फिरकीने हैदराबादच्या फलंदाजांना नाचवू शकतो. या मोसमातील सर्वात महागडा खेळाडू कॅमेरॉन ग्रीन याच्याकडूनही आज मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे.
advertisement
हैदराबादची फायरब्रँड फलंदाजी विरुद्ध ढिली गोलंदाज
सनरायझर्स हैदराबादची ताकद त्यांची फलंदाजी आहे. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड ही जोडी कोणत्याही गोलंदाजीची पिसे काढू शकते. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत इशान किशन संघाचं नेतृत्व करत असून तो स्वतः जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सोबतच हेनरिक क्लासेन सारखा स्फोटक फलंदाज मधल्या फळीत आहे. मात्र, हैदराबादसाठी चिंतेची बाब म्हणजे त्यांची गोलंदाजी. पहिल्या सामन्यात २०० हून अधिक धावा देऊनही आरसीबीने १५.४ षटकांतच त्यांच्या गोलंदाजांना धू-धू धुतलं होतं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
KKR vs SRH: अभिषेक शर्मा की नरेन, कुणाची चालणार जादू, कोण ठरणार वरचढ?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement