विरार-अलिबाग कॉरिडॉरला ब्रेक, मुंबई बडोदासाठी नवा हायवे, कसा असेल मार्ग?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
भारताची राजधानी दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबईसाठी महत्त्वाचं असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीए) यांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी दिल्ली-मुंबई कॉरिडॉर प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) मोठी हालचाल सुरू केली आहे.
भारताची राजधानी दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबईसाठी महत्त्वाचं असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीए) यांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी दिल्ली-मुंबई कॉरिडॉर प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) मोठी हालचाल सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) विरार-अलिबाग कॉरिडॉर अंतर्गत जेएनपीएला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामात कमालीची दिरंगाई होत असल्याने, आता एनएचएआयने स्वतःच १४ किलोमीटरचा नवा आणि अतिरिक्त रस्ता उभारण्याचा आराखडा तयार केला आहे.
मोरबे ते कळंबोली मार्गे तळोजापर्यंत जोडणी
बडोदा-मुंबई द्रुतगती महामार्ग सध्या महाराष्ट्रातील तलासरीपासून मोरबे असा आहे. या ८ पदरी महामार्गाचे बांधकाम ७० टक्के पूर्ण झाले असून, मोरबे येथील माथेरानच्या डोंगराखालील बोगद्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. नियमानुसार, हा रस्ता पुढे विरार-अलिबाग कॉरिडॉर मार्गे जेएनपीए बंदरापर्यंत जोडला जाणार होता. मात्र, एमएसआरडीसीकडून हा प्रकल्प रखडल्याने, एनएचएआयने आता यावर नवा पर्याय शोधला आहे.
advertisement
नवीन आराखड्यानुसार, हा १४ किमीचा जोड रस्ता मोरबे ते कळंबोली मार्गे तळोजा असा असेल. एनएचएआयच्या नवीन आराखड्यानुसार, मोरबे येथील बोगद्यातून बाहेर पडणाऱ्या वाहनांना हा नवा रस्ता थेट तळोजापर्यंत घेऊन जाईल. या मार्गावर केवळ दोन ते तीन किलोमीटरचा नवा रस्ता बांधावा लागणार आहे, तर उर्वरित मार्गासाठी एमआयडीसीतील सध्याचा रस्ता वापरला जाणार आहे. यासाठी या रस्त्याचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.
advertisement
एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन रस्त्याच्या आराखड्याला मंत्रालयाची मंजूरीदेखील मिळाली आहे. या निर्णयामुळे जेएनपीए बंदरापर्यंतचा प्रवास जलद आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2025 9:33 AM IST








