आज मार्गशीर्ष महिन्याचा 3 रा गुरुवार! या राशींची साधना फळाला लागणार, आर्थिक तंगी दूर होणार

Last Updated:
Astrology News : वैदिक पंचांगानुसार, आज दिनांक 11 डिसेंबर 2025, गुरुवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जात आहे.
1/9
astrology news
वैदिक पंचांगानुसार, आज दिनांक 11 डिसेंबर 2025, गुरुवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जात आहे. मार्गशीर्ष महिन्यातील हा तिसरा गुरुवार असून या दिवशी ग्रहांचा दुर्मिळ संयोग निर्माण होत आहे. गुरू आणि शुक्र यांच्या शुभ प्रभावामुळे7 राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. विशेषत: धनलाभ, करिअरमध्ये प्रगती, नवी संधी आणि मानसिक समाधान मिळण्याची शक्यता जास्त असल्याचे ज्योतिषांच्या अंदाजातून समोर येत आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने हा दिवस अनेकांसाठी भाग्यवर्धक ठरेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आज तुमच्या राशीचे नशीब कसे असेल? हे जाणून घेऊया.
advertisement
2/9
astro
मेष - मेष राशीच्या व्यक्तींना आज उत्तम आत्मविश्वासाची साथ लाभणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्ही धडाडीने निर्णय घ्याल आणि कठीण आव्हानंही सहज पार कराल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. आर्थिक स्थितीत स्थिरता राहील. स्वतःवरचा विश्वास वाढत असल्याने दिवस चांगला जाईल.
advertisement
3/9
वृषभ
वृषभ -  वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ध्येय निश्चित करण्याचा आहे. तुमचे निर्णय आत्मविश्वासाने भरलेले असतील. स्वतंत्रपणे कार्य करण्याचा आनंद आणि समाधान लाभेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. कुटुंबीयांकडून पाठिंबा मिळेल.
advertisement
4/9
मिथुन
मिथुन - मिथुन राशीच्या व्यक्ती आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अग्रेसर राहतील. एखादी महत्त्वाची संधी तुमच्याकडे येईल आणि तिचा योग्य उपयोग तुम्ही ओळखून कराल. लोकांमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक क्षेत्रात नवीन संपर्क उपयोगी पडतील.
advertisement
5/9
कर्क
कर्क - कर्क राशीच्या महिलांना आज विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. हातातील कामात प्रगती होईल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर नीट माहिती घेऊनच निर्णय घ्या. कुटुंबात वातावरण आनंदी राहील. भावनिक स्थैर्य मिळेल.
advertisement
6/9
astro
सिंह - सिंह राशीसाठी आज आर्थिक लाभ होईल; मात्र, खर्चाचे प्रमाण जास्त राहू शकते. पैशांची आवक वाढेल पण खर्चाच्या मार्गांमुळे थोडी चिडचिड संभवते. नियोजन करून खर्च करा. घरात छोटा वाद होऊ शकतो, संयम ठेवा.
advertisement
7/9
astro
कन्या - कन्या राशीच्या व्यक्तींना वारंवार घरापासून दूर राहण्याची परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे घरातील व्यक्तींची नाराजी तुमच्यावर येऊ शकते. कामाच्या ठिकाणी गती मिळेल, परंतु कौटुंबिक तणाव जाणवू शकतो. आरोग्याची काळजी घ्या.
advertisement
8/9
astro
तूळ - तूळ राशीच्या लोकांच्या स्वभावातील काही गोष्टींमुळे जवळच्या लोकांची नाराजी संभवते. कोणताही निर्णय उतावळेपणाने घेऊ नका. विचारपूर्वक बोलणे आणि शांत राहणे आवश्यक आहे. कामात काही विलंब होऊ शकतो, पण परिस्थिती नंतर सुधारेल.
advertisement
9/9
astrology
<strong>(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही) </strong>
advertisement
Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement