Ashok Kharat Case: पोलीस कोठडीची मागणी, कोर्टानं खरातला विचारलं, तुम्हाला काही बोलायचं? हात जोडून म्हणाला...
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:Laxman Ghatol
Last Updated:
Ashok Kharat Case: एका महिलेवर अत्याचार आणि तिचा गर्भपात केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गु्न्ह्यात खरातला आज कोर्टात हजर करण्यात आले. जवळपास २०-२५ मिनिटे युक्तिवाद करण्यात आला.
नाशिक: महिलांचे लैगिंक शोषण, लोकांची जादूटोणाच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणातील आरोपी अशोक खरातला आज कोर्टात हजर करण्यात आले. एका महिलेवर अत्याचार आणि तिचा गर्भपात केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गु्न्ह्यात खरातला आज कोर्टात हजर करण्यात आले. जवळपास २०-२५ मिनिटे युक्तिवाद करण्यात आला. यावेळी कोर्टाने आरोपी खरातला तुम्हाला काही बोलायचे आहे असा सवाल केला.
महिला लैंगिक शोषण आणि लोकांची तंत्रमंत्रच्या नावाखाली फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. अशोक खरातने जवळपास १०० हुन महिलांचे शोषण केल्याचा संशय आहे. तर, दुसरीकडे लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचाही आरोप आहे. बुधवारी खरातला एका प्रकरणात न्यायलयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आज आणखी एका प्रकरणात खरातला कोर्टात आज हजर करण्यात आले.
advertisement
सरकारी वकिलांनी काय म्हटले?
आरोपीची लैंगिक शोषण करण्याची मोडस होती, गर्भपात करण्यासाठीचे औषध कुठून आणले, पीडित महिलेच्या आई वडिलांना त्याने धमकावले, आधार कार्ड पॅन कार्ड कशासाठी घेतले ? त्याचे काय केले ? आरोपी मास्टर माईंड तपासात सहकार्य करत नाही, कोणते औषध वापरत होता, मंतर लेले पाणी मध्ये काय टाकत होता हे तपासायचे आहेत, त्यासाठी तपास करायचा आहे, गंभीर गुन्हा असल्यानं तपास करायचा आहे 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
advertisement
खरातच्या वकिलांचा युक्तिवाद काय?
आरोपी खरातचे वकील अॅ़ड. भाटे यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, पहिल्या गुन्ह्यात ७ दिवसांची पोलीस कस्टडी दिली होती, दुसऱ्या गुन्ह्यात पण तेच आहे ,१४ दिवसांत या गुन्ह्यांचा तपास झाला आहे, जबाब झाला आहे, रिमांड रिपोर्ट मध्ये मांडले आहे, २०२०२ ते २०२६ मध्ये जे घडले ते ग्राउंड रिपोर्ट मध्ये आले आहे, त्यात मला वाचायला दिले नाही, सारखेच ग्राउंड रिपोर्ट मांडत आहे. मला FIR वाचायला मिळाली नाही, गर्भपात करण्यासाठी कायदा आहे त्यानुसार काही केलं आहे का? जादूटोणा कायदा लावला त्याबाबत तपास केला आहे, सगळे व्हिडीओ जनमानसात गेले, त्यानुसार बलात्कार आणि जादूटोणा केला असे काय आधारावर आरोप, त्याचे कारणे मांडावी, दैव शक्ती होती त्याचे प्रलोभने द्यायचा आणि मग अत्याचार करायचा असे त्यात नमूद आहे, त्यानुसार पीडित महिलेचे जबाब घेतले आहे, पाण्यात काय मिसळले त्यात तपास बाकी असे काय ? त्यामुळे पोलीस कस्टडी देऊ नका असे खरातच्या वकिलांनी म्हटले.
advertisement
खरातला कोर्टाने विचारलं, तुम्हाला काय बोलायचं? खरात म्हणाला...
आजची सुनावणी ही व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली. युक्तिवाद झाल्यानंतर आरोपी अशोक खरात याला कोर्टाने तुम्हाला काही बोलायचे आहे का, असा सवाल केला. त्यावर आरोपी खरात याने हात जोडत कोर्टाला नाही असे उत्तर दिले.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 12:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Case: पोलीस कोठडीची मागणी, कोर्टानं खरातला विचारलं, तुम्हाला काही बोलायचं? हात जोडून म्हणाला...







