आजचं हवामान: थंडीची लाट कायम राहणार, 15 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढली असून भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन.
Weather update: मुंबई उपनगर आणि नवी मुंबई, ठाणे पट्ट्यात आता गुलाबी नाही तर अंगाला बोचणारी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. तसं तर विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानाचा पारा हा ६ अंशांहून कमी होत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे. मध्य भारत आणि उत्तरी प्रायद्वीपीय भारतामध्ये कोल्ड वेवची स्थिती कायम राहणार असून, यात महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक भागांत थंडीची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
थंडीची लाट कायम राहणार
सध्या राज्यात शीत लहरीची स्थिती विदर्भ, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या काही भागांत मागील पाच दिवसांपासून सातत्याने नोंदवली जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील किमान तापमानाचा पारा आणखी खाली उतरण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात पुढील तीन दिवसांत हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. मात्र, यानंतर लगेचच पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
advertisement
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला यलो अलर्ट
राज्यातील अनेक भागांत आज रात्री आणि उद्या सकाळी थंडीची लाट कायम राहणार आहे. विशेषतः उत्तर आंतरिक महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड आणि उत्तर आंतरिक ओडिशात शीत लहरीची स्थिती जाणवेल, यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. १२ आणि १३ डिसेंबरच्या दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगणा आणि उत्तर आंतरिक ओडिशामध्ये ही शीत लहरीची स्थिती कायम राहील.
advertisement
या जिल्ह्यांसाठी अलर्ट
view commentsनंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तापमान घसरणार असून यलो अलर्ट 48 तासांसाठी देण्यात आला आहे. उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र होत असून तिथून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडी पडली आहे. नागरिकांना आणि शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 11, 2025 7:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: थंडीची लाट कायम राहणार, 15 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?








