टँकसारख्या मजबूत आणि दणकट, डोळे झाकून घेता येईल अशा सेफ्टी 5 SUV, किंमतही कमी
- Published by:Sachin S
Last Updated:
फक्त चार चाकाची कार नको तर एक सुरक्षित आणि मजबूत गाडी घेण्याचा कल वाढला आहे. त्यातच टाटा मोटर्स, महिंद्रा मोटर्सच्या गाड्या या पहिल्या पसंतीच्या आहेत.
भारतात सध्या जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे कारच्या किंमतीत एसयूव्ही उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबीयांचा कल हा एसयूव्ही खरेदीकडे वाढला आहे. अशातच फक्त चार चाकाची कार नको तर एक सुरक्षित आणि मजबूत गाडी घेण्याचा कल वाढला आहे. त्यातच टाटा मोटर्स, महिंद्रा मोटर्सच्या गाड्या या पहिल्या पसंतीच्या आहेत. पण, स्वस्तात आणि मस्त अशा काही सेफ्टी रेटिंग ५ स्टार असलेल्या गाड्याही मार्केटमध्ये बजेटमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
कोणती कार किंवा एसयूव्ही किती सुरक्षित आहे, याची चाचणी ही Bharat NCAP (New Car Assessment Program) आण NCAP ग्लोबल क्रॅश टेस्ट रिपोर्ट ठरवत असतो. या टेस्टमध्ये कारमध्ये बसलेला प्रवासी किती सुरक्षित आहे, लहान मुलांची किती सुरक्षा आहे, याचा रिपोर्ट तयार करत असतो, या रिपोर्टवरूनच कारचे सेफ्टी रेटिंग ठरलेले असतात.
advertisement
आता जर सेफ्टीमध्ये पहिल्या नंबरवर आली आहे ती अलीकडेच लाँच झालेली महिंद्रा आणि महिंद्रा मोटर्सची Mahindra XEV 9E. ही मुळात Mahindra XEV 9E एक इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. पण, Mahindra XEV 9E या एसयूव्हीने Bharat NCAP क्रॅश टेस्टिंगमध्ये सर्वाधिक ५ स्टार रेटिंग मिळवले आहे. पुरुषांच्या सुरक्षेत (Adult Safety) 32 पैकी 32 गूण मिळाले आहे. तर लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी (Child Safety) 49 पैकी 45 गूण मिळाले आहे. आतापर्यंत कोणत्या गाडीला मिळालेले हे सर्वाधिक गूण आहे.
advertisement
दुसऱ्या नंबरवर आली आहे Maruti Suzuki Victoris. मारुतीने अलीकडे Maruti Suzuki Victoris लाँच केली आहे. ही एक मिड साईज एसयूव्ही आहे. Maruti Suzuki Victoris ला Bharat NCAP मध्ये 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. पुरुषांच्या सेफ्टीसाठी 31.66 गूण मिळाले आहे. तर लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी 43 गूण मिळाले आहे. Maruti Suzuki Victoris ची किंमत ऑन रोड किंमत ही 12.35 लाखांपासून सुरू होते.
advertisement
advertisement
टाटा मोटर्सची tata punch EV ही यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. tata punch EV ही एक इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. tata punch EV ला Bharat NCAP मध्ये 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. पुरुषांच्या सुरक्षिततेसाठी 32 पैकी 31.46 गूण मिळाले आहे. तर लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी 49 पैकी 45 गूण मिळाले आहे. या tata punch EV किंमत ९.९९ लाखांपासून सुरू होते.
advertisement
तर Mahindra ची Thar Roxx ही पाचव्या क्रमांकावर आहे. महिंद्राने मागील वर्षीच thar चे 5-डोर व्हर्जन म्हणून Thar Roxx लाँच केली. Thar Roxx ला Bharat NCAP टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले. पुरुषांच्या सुरक्षिततेसाठी 31.09 गूण मिळाले आहे. तर लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी 45 गूण मिळाले आहे. Thar Roxx ची किंमत ही 14.59 लाखांपासून सुरू होते.









