IPL 2026 : वैभव सूर्यवंशीनंतर आता आणखी एक जण आला... आयपीएल लिलावात छोट्या पोराची एन्ट्री!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
14 वर्षीय वैभव सूर्यवंशी हा आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू आहे. तो मागील हंगामाच्या लिलावात विकला गेला होता.
मुंबई : 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी हा आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू आहे. तो मागील हंगामाच्या लिलावात विकला गेला होता. आता, त्याच्यानंतर आयपीएल 2026 च्या लिलावात आणखी एक लहान वयाचा खेळाडू आला आहे. हा खेळाडू आयपीएल 2026 च्या लिलावात सहभागी होणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. वहिदुल्लाह झदरान असं या खेळाडूचं नाव आहे. अफगाणिस्तानचा हा क्रिकेटपटू 16 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या आयपीएल लिलावात सर्वात तरुण खेळाडू असेल.
वहिदुल्लाह झदरान हा लिलावात सहभागी होणाऱ्या 350 खेळाडूंपैकी सर्वात तरुण आहे. अफगाणिस्तानचा वहिदुल्लाह झदरान 18 वर्षांपेक्षा थोडा जास्त वयाचा आहे. आयपीएल 2026 च्या लिलावाच्या दिवशी तो फक्त 18 वर्षे आणि 31 दिवसांचा असेल. या वयात, तो लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वात तरुण असेल.

advertisement
19 टी-20 सामन्यांमध्ये 28 बळी
वहिदुल्लाह झदरान हा उजव्या हाताचा स्पिन बॉलर आहे. आयपीएल लिलावात येण्यापूर्वी त्याला 19 टी-20 सामन्यांमध्ये खेळण्याचा अनुभव होता, ज्यामध्ये त्याने 28 बळी घेतले होते. त्याची सर्वोत्तम कामगिरी 22 रनमध्ये 4 बळी ही होती. आयपीएल 2026 च्या लिलावात येण्यापूर्वी वहिदुल्लाह झदरानला आयएलटी20 मध्ये खेळण्याचा अनुभव देखील आहे. वहिदुल्लाह झदरानने आयपीएल लिलावात त्याची मूळ किंमत 30 लाख रुपये ठेवली आहे.
advertisement
वहिदुल्लाह झदरान नुकत्याच संपलेल्या दोन भारतीय अंडर 19 टीम विरुद्धच्या वनडे ट्रायएन्ग्युलर सीरिजमध्ये अफगाणिस्तान अंडर-19 कडून खेळला. त्याने भारतात खेळलेल्या त्याच या सीरिजमध्ये 3 सामन्यांमध्ये 3 विकेट घेतल्या. याशिवाय, त्याने बॅटिंग करताना 2 डावांमध्ये 12 रन केल्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 10, 2025 11:27 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : वैभव सूर्यवंशीनंतर आता आणखी एक जण आला... आयपीएल लिलावात छोट्या पोराची एन्ट्री!










