'हौंसला-ईंधन-बदला' चा अर्थ काय? Dhurandhar 2 च्या ट्रेलरमध्येच दडलेत 5 मोठे सीक्रेट्स, 90% लोकांना माहीत नाही
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dhurandhar 2 हा केवळ एक स्पाय थ्रिलर नाही, तर यात मानवी भावना, इतिहास आणि सूडाचं असं एक कॉकटेल आहे जो पहिल्या फटक्यात समजणं कठीण आहे. या ३ मिनिटांच्या ट्रेलरमधून समोर आलेले ५ धक्केदायक खुलासे तुम्हाला थक्क करतील.
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २: द रिव्हेंज' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि इंटरनेटवर जणू वादळच आलं. रणवीर सिंगच्या डोळ्यांतील तो खुन्नस पाहून अंगावर काटा येतो. पण हा केवळ एक स्पाय थ्रिलर नाही, तर यात मानवी भावना, इतिहास आणि सूडाचं असं एक कॉकटेल आहे जो पहिल्या फटक्यात समजणं कठीण आहे. या ३ मिनिटांच्या ट्रेलरमधून समोर आलेले ५ धक्केदायक खुलासे तुम्हाला थक्क करतील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रहमान डकैतच्या मुलाला आणि कुटुंबाला ज्या पद्धतीने हमजाने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, त्यामागे एक मोठं ट्रेनिंग होतं. ट्रेलरच्या क्रेडिट्समध्ये उर्दू, इतिहास आणि ड्रामा टीचरचे नाव आहे. याचा अर्थ, हमजाला केवळ लढायला नाही, तर अभिनय करायलाही शिकवलं गेलं होतं. म्हणूनच तो पाकिस्तानात जाऊन कोणालाही संशय न येता वावरू शकला.
advertisement
advertisement
ट्रेलरमध्ये 'रेड कलर'ची थीम वारंवार दिसते, जी सूडाचे प्रतीक आहे. रहमान डकैतच्या मृत्यूनंतर पाकिस्तानच्या ल्यारी भागात उजैर बलोच आणि अरशद पप्पू यांच्यात सुरू झालेलं गँगवॉर यात दिसणार आहे. वास्तविक आयुष्यात २०१३ मध्ये उजैर बलोचने अरशद पप्पूचं शिर कापून त्याच्याशी फुटबॉल खेळल्याची भयानक घटना घडली होती, त्याचा संदर्भ या चित्रपटात दिला जाण्याची शक्यता आहे.
advertisement
ट्रेलरमध्ये पांढरा पठानी कुर्ता आणि हातात सिगारेट घेतलेला एक करारी अधिकारी दिसतो, तो म्हणजे चौधऱी असलम. ज्यांनी खऱ्या आयुष्यात २००९ मध्ये रहमान डकैतचा एनकाउंटर केला होता. २०१४ मध्ये ल्यारी एक्सप्रेसवेवर एका कार बॉम्ब स्फोटात त्यांची हत्या झाली होती. 'धुरंधर २' मध्ये या खऱ्या घटनांचा वापर करून फिक्शनची अशी काही गुंफण केलीय की प्रेक्षकांचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत.









