advertisement

The 50 मधील वादाला गंभीर वळण, रिद्धिमा पंडितची वंशज सिंगवर कायदेशीर कारवाई, क्रिएटरचं अभिनेत्रीला सडेतोड उत्तर

Last Updated:
The 50 Controversy: 'बहू हमारी रजनीकांत' फेम रिद्धिमा पंडितने डिजिटल क्रिएटर वंशज सिंग विरुद्ध कायदेशीर लढाई पुकारली आहे.
1/8
हिंदी मालिकाविश्वातील लाडकी 'बहू' रिद्धिमा पंडित सध्या एका गंभीर वादात अडकली आहे. 'बहू हमारी रजनीकांत' फेम या अभिनेत्रीने डिजिटल क्रिएटर वंशज सिंग विरुद्ध कायदेशीर लढाई पुकारली आहे.
हिंदी मालिकाविश्वातील लाडकी 'बहू' रिद्धिमा पंडित सध्या एका गंभीर वादात अडकली आहे. 'बहू हमारी रजनीकांत' फेम या अभिनेत्रीने डिजिटल क्रिएटर वंशज सिंग विरुद्ध कायदेशीर लढाई पुकारली आहे.
advertisement
2/8
वंशजच्या चाहत्यांकडून सातत्याने मिळणाऱ्या धमक्या आणि अश्लील मेसेजमुळे त्रस्त झालेल्या रिद्धिमाने अखेर पोलिसात धाव घेतली असून वंशजला कायदेशीर नोटीस धाडली आहे.
वंशजच्या चाहत्यांकडून सातत्याने मिळणाऱ्या धमक्या आणि अश्लील मेसेजमुळे त्रस्त झालेल्या रिद्धिमाने अखेर पोलिसात धाव घेतली असून वंशजला कायदेशीर नोटीस धाडली आहे.
advertisement
3/8
या वादाची सुरुवात The 50 या रिअॅलिटी शोच्या सेटवर झाली. शोमध्ये रिद्धिमा आणि वंशज यांच्यात एका टास्कदरम्यान जोरदार खडाजंगी झाली होती. रिद्धिमाने वंशजच्या वागण्यावर आक्षेप घेत त्याला उद्धट म्हटलं होतं, तर वंशजने तिला तिच्या वयावरून हिणवलं होतं.

4/8
हा वाद फक्त कॅमेऱ्यापुरता मर्यादित राहिला नाही. शोमधून बाहेर पडल्यानंतर वंशजने इंस्टाग्रामवर रिद्धिमाला लक्ष्य केलं. तिने त्याला ब्लॉक केल्याचा राग मनात धरून त्याने आपल्या फॉलोअर्सना चिथावणी दिल्याचा आरोप रिद्धिमाने केला आहे.

5/8
रिद्धिमाच्या कायदेशीर टीमने दिलेल्या माहितीनुसार, वंशजच्या पोस्ट्सनंतर त्याच्या चाहत्यांनी रिद्धिमाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अश्लील कमेंट्स करण्यात येत आहेत. तिला केवळ शिवीगाळच केली जात नाहीये, तर जीवे मारण्याच्या आणि लैंगिक शोषणाच्या गंभीर धमक्याही दिल्या जात आहेत.

6/8
यामुळे रिद्धिमा आणि तिचं कुटुंब सध्या प्रचंड मानसिक दडपणाखाली आहे. रिद्धिमाच्या टीमने झूमशी बोलताना स्पष्ट केलं की,
यामुळे रिद्धिमा आणि तिचं कुटुंब सध्या प्रचंड मानसिक दडपणाखाली आहे. रिद्धिमाच्या टीमने झूमशी बोलताना स्पष्ट केलं की, "ही बातमी खरी असून आम्ही सायबर सेलकडे तक्रार नोंदवली आहे आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे."
advertisement
7/8
कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर वंशज सिंग शांत बसलेला नाही. त्याने आपल्या 'X' हँडलवर रिद्धिमाला थेट इशारा देत लिहिलं,
कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर वंशज सिंग शांत बसलेला नाही. त्याने आपल्या 'X' हँडलवर रिद्धिमाला थेट इशारा देत लिहिलं, "डियर रिद्धिमा पंडित, तू अशा शक्तींना डिवचलं आहेस ज्याची तुला कल्पनाही नाही."
advertisement
8/8
इतकंच नाही तर त्याने नोटीसचे स्क्रीनशॉट्स शेअर करत लिहिलं की,
इतकंच नाही तर त्याने नोटीसचे स्क्रीनशॉट्स शेअर करत लिहिलं की, "कोणीही मला गप्प करू शकत नाही. मी माझ्या लोकांसाठी बोलत राहणार. हिंमत असेल तर सर्वांनी मिळून या!" वंशजने स्वतःला केवळ क्रिएटर न म्हणता एक चळवळ असल्याचं म्हटलं आहे. 
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement